ठाणे, 

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे व टाटा कॅपिटल सहकार्याने, सुधागडातील माध्यमिक 14 शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेसाठी पुस्तके वाटप व तरखडकर भाग 1, 2 इंग्लिश व्याकरण पुस्तके वाटप करून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा साठी प्रोत्साहन देण्यांत आले. मजरे जांभुलपाडा येथे सर्व मुख्याध्यापक यांची मिटिंग घेऊन वार्षिक कार्यक्रमांची चर्चा करून नियोजन करण्यात आले. तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक व टाटा कॅपिटलचे प्रकाश महाडिक सर, संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे, शिक्षण समिती प्रमुख वसंत लहाने व दत्ता दळवी उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रकाश शिलकर, विजय जाधव, बबन चव्हाण, प्रकाश वाघमारे व रघुनाथ इंदुलकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

अवश्य वाचा