रोहा :

          कृषी महाविद्यालय दापोली येथील कृषि दूतांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत यशवंतखार गावात विविध प्रकारचे कार्यक्रम राबविले. त्यामध्ये कृषिदूतांनी गावातील कृषी विषयक समस्या,नवीन तंत्रज्ञान,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती,शेतीतील नुकसान व फायदे , किडीचा प्रादुर्भाव यावर सविस्तर चर्चा केली.  तसेच बियाण्याचे टॅग त्या विषयी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. प्रत्यक्ष टॅग दाखवून माहिती पटवून दिली. कार्यक्रम भैरवनाथ मंदिर यशवंतखार येथे घेण्यात आला होता.कार्यक्रमाला गावातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद देत आपली उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्र रोहा चे कार्यक्रम अधिकारी डॉ प्रमोद मांडवकर, सहाय्यक प्राध्यापक डॉ पालशेतकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.सदरील कार्यक्रम भूमिपुत्र गटप्रमुख राजरत्न पाटील ,सदस्य जयंत शिंदे,चेतन जगताप,शुभम धाडवे,विशाल थोरात यांनी आयोजित केला होता.

 

अवश्य वाचा

म्हसळा येथे माघी गणेशोत्सव