भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने इतिहास रचताना जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. स्वित्झर्लंडच्या बासेलमध्ये झालेल्या जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम लढतीत सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराला २१-, २१-असे पराभूत करून  सुवर्णपदक पटकावले आहे.  सिंधू ने सुरुवातीपासूनच  आक्रमक खेळ करताना नेट प्लेसिंग आणि परतीच्या फटक्यांचा अतिशय उत्तम मेळ घालत पहिला सेट केवळ १६  मिनिटांत जिंकला आणि तिथेच ओकुहाराचे आव्हान संपुष्टात आले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सिंधू पहिली भारतीय खेळाडू आहे. जागतिक स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठणाऱ्या सिंधूने जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत चीनच्या चेन यू फेइवर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या स्पर्धेत यापूर्वी तिने दोन रौप्य आणि दोन ब्राँझपदके मिळवली असून तिच्या या ऐतिहासिक कामगिरी बद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर वरून तिचे अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे तिच्या आईचा  आजच वाढदिवस होता आणि तिने आईला वाढदिवसाची सुंदर भेट दिली. फुलराणी सिंधूचे यश तरुणाई साठी प्रेरणादायी असून तिचे विशेष अभिनंदन !

अवश्य वाचा