फेसबुक व्हाट्सऍप ट्विटर यासह सर्व समाज माध्यमांना आधारशी जोडण्याचा सरकारचा विचार आहे त्या संदर्भात एक जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे सुप्रीम कोर्टाने या संदर्भात सरकारसह व्हाट्सऍप फेसबुक ट्विटर गुगल यु ट्यूब यांना नोटीसाही बजावल्या आहेत त्यामुळे समाजमध्यमांना आधार कार्ड करावे का नाही याबाबतीत देशात मोठी चर्चा चालू आहे माझ्या मते समाजमध्यमांना आधार कार्ड लिंक करायलाच हवा समाजमाध्यमांवर पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्या अफवा देश विरोधी संदेश बदनामीकारक अश्लील मजकूर जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे पोस्ट यावर अंकुश ठेवण्यासाठी समाजमध्यमांना आधारकार्डशी जोडणे अत्यावश्यक आहे समाज माध्यमांवर आज कोणाचाही अंकुश नाही समाजमाध्यमांवर आज लाखो फेक अकाउंट आहेत या फेक अकाउंट वरुनच समाजविघातक पोस्ट टाकल्या जातात या पोस्टमुळेच सामाजिक ऐक्याला धोका निर्माण होतो या समाजविघातक व अफवा पसरवणारे मेसेज समाजमाध्यमांवर व्हायरल होतात यावेळी मूळ मेसेज कोणी पोस्ट केला हे समजून येत नाही  मागील काही वर्षात झालेल्या दंगली व झुंडबळीच्या वाढत्या घटनेला समाजमाध्यमेही जबाबदार आहे समाजमाध्यम म्हणजे अफवा पसरवण्याचे साधन बनले आहे समाजमाध्यमांवर अकाऊंट उघडताना कोणताही पुरावा मागितला नाही त्यामुळे स्वतःची ओळख लपवून फेक अकाउंट उघडले जाते समाजमाध्यमांना आधारशी जोडले तर कोणालाही फेक अकाउंट उघडता येणार नाही त्यामुळे कोणीही बदनामीकारक अफवा पसरवणाऱ्या तसेच समाजविघातक पोस्ट कोणीही टाकणार नाहीत जरी टाकल्या तरी त्या कोणी टाकल्या हे आधारकार्डमुळे समजेल श्याम बसप्पा ठाणेदार दौंड जिल्हा पुणे 9922546295

 

अवश्य वाचा

म्हसळा येथे माघी गणेशोत्सव