Arun Jaitley

माणूस आणि माणुसकी जपणार असामान्य, रुबाबदार व्यक्तिमत्व, धुरंधर, प्रतिभावंत नेता अरुण जेटली यांच्या एक्झिट मुळे केवळ भारतीय जनता पक्षाचीच नव्हे तर देशाची फार मोठी हानी झालेली आहे. जेटली सारख्या महान व्यक्ति केवळ एका पक्षाच्या नसतात त्या असतात देशाच वैभव. अजातशत्रु, विरोधकांनाही लीलया मित्र करणारा निष्णात राजकरणी, त्यांनी देशाची अर्थमंत्री, कायदामंत्री, जलवाहतुक मंत्री आणि विरोधी पक्षनेता म्हणून जबाबदारी सांभाळत असताना आपल्या कार्य कर्तुवाने एक आगळा वेगळा ठसा उमटविला केवळ देशहीतासाठी, जनतेचे हीत लक्षात घेऊनच हे विसरता येणे शक्य नाही. जेटली यांची एक्झिट भारतीय जनता पक्षासह संपूर्ण भारतीयांना चटका लावणारीच.

 

अवश्य वाचा