Arun Jaitley

नुकतेच देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे  ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे यांचे  दुर्धर आजाराने वयाच्या ६६ व्या वर्षी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दुख:द निधन झाले. सर्वोच्च न्यायालयात आणि अनेक उच्च न्यायालयात वकिली केल्यानंतर जेटली यांनी १९९१ मध्ये सक्रीय राजकारणात प्रवेश केला. १९९९ मध्ये पक्षाचे मुख्य प्रवक्ते तर वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात माहिती आणि प्रसारण मंत्री तसेच निर्गुंतवणूक मंत्रालयाचा  कार्यभार सांभाळणाऱ्या जेटली यांनी वाजयेपी यांच्या मंत्रिमंडळातून राम जेठमलानी यांनी राजीनामा दिल्यानंतर कायदा आणि न्याय तसेच कंपनी व्यवहार या मंत्रालयांचा अतिरिक्त कार्यभार पाहीला होता. २००४ ते २०१४ मध्ये ते  राज्यसभेत विरोधी पक्षनेते आणि २०१४ च्या मोदी सरकारमध्ये ते अर्थ मंत्री आणि काही काळ संरक्षण मंत्री होते. निष्णात कायदेपंडित, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर कमालीचे प्रभुत्व, अनेक विषयांचा आवाका, राष्ट्रीय राजकारणाचा अचूक वेध घेणारे, अफाट निर्णयक्षमता आणि दूरदृष्टी असलेले, अभ्यासू संसदपटू, उत्कृष्ट वक्ते  असे बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे जेटली भाजपसाठी संकटमोचक होते. जेटलींच्या निधनाने भाजपच्या आकाशातील अरुणाचा अस्त झाला आहे. त्यांना विनम्र आदरांजली !

 

अवश्य वाचा