धाटाव २४ ऑगस्ट

     गोविंदा रे गोपाळा,यशोदेच्या तान्ह्या बाळा,यांच्या घरात नाही पाणि घागर उतानी रे गोपाला.गोविंदा आणि गोपाळा चला र दादानु हंडी फोडाला अशा विविध पारंपरिक गाण्याची लय धरून खालूबाजा आणि सनईच्या तालावर थिरकत धाटावच्या गोविंदा पथकाने जागोजागि दहिहंडया फोडून गोपालकाला सण उत्साहात साजरा केला.

    रात्रि कृष्ण जन्माच्या नंतर सकाळ पासुनच धाटाव मधील गोविंदा पथक दहिहंडया फोडण्यासाठी सज्ज झाले होते.पिवळ्या रंगाच्या बनियन परिधान करून धाटाव मधील सर्व तरुणाई हंडया फोडायला एकवटली.हार,फुले,नारळ,फलांसह इतर साहित्याने सजविलेल्या हंड्या गावात आकर्षण ठरल्या.लहान मूलांपासुन तरुणाई बरोबर जेष्ठ मंडळीसह लहान मूलीना सुद्धा खालूबाजाच्या तालावर थिरकन्याचा मोह आवरला नाही.गावात जागोजागी बांधन्यात आलेल्या दहिहंड्यांना सलामी देत एक एक हंडी फोडित निघालेल्या गोविंदा पथकाने हंड्या फोडल्या.दारोदारी या गोविंदा पथकाला प्रसाद देण्यात येत होते.तर काही ठिकाणी गोविंदा पथकावर पाण्याच्या मारा केला जात असल्याने तरुणांमधे मात्र चांगलाच उत्साह पहावयास मिळाला.

       गावातील दहिहंडया फोडून झाल्यानंतर सोनारसिद्ध धाटाव गोविंदा पथकाच्या सर्व तरुण वर्गाने महाड़,माणगाव येथील ऊंच मनोरे उभारुन दहिहंडी फोड़न्याच्या स्पर्धेकडे कुच केली. 

अवश्य वाचा