सुधागड-पाली  

आध्यात्मिक महत्त्व, भक्तिपूर्ण, सामाजिक रूप, एकतेचा, व्यवस्थापकीय कौशल्य दाखवणारा सण म्हणजे गोपाळकाला. विविध पद्धतींनी जुन्या रुढी, परंपरा जपत  हा सण मोठय़ा जल्लोशात साजरा होतो. गोपाळकाला हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रतिनिधित्व करतो.

कृष्ण अनादी, अनंत विष्णूचा आठवा अवतार. कृष्णजन्म, त्याचे बालपण, त्याचे तत्त्वज्ञान, त्याचे कृष्ण हा विष्णूचा एकमेव पूर्णावतार. युगानुयुगे लोकांना कृष्णाच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाचे अनेक पलू भुरळ घालत असतात. काहींना त्याचे  मात्र भावते तर काहींना तेज, शौर्य, पराक्रम, धर्य, अपूर्व बुद्धिमत्ता, कुशल राजानितीज्ञत्व, मुत्सद्देगिरी, निस्वार्थीपणा असे गुण आकर्षति करतात. कृष्ण म्हणजेच आकर्षकता.

अशा लाडक्या कृष्णाचा जन्म साऱ्या भारतभर मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असताना झाला. त्याचे स्मरण ठेवण्यासाठी गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात व मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात.

 आज ही महाराष्ट्राच्या काही भागात भक्ती गोकुळ अष्टमि भावाने साजरा करतात.रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात आज ही कोन्होबा अंगात येत आसतात,परंपरा सुधागड तालुक्यातील पंचक्रोशीत आज ही सुरु आहे  गोकुळाष्टमीचा उत्सव जुनी आज ही रीतिरिवाजानुसार  सुरू असून जांभुळपाडा , टाटाचामाल, व-हाड ,विजयनगर,  येथील ग्रामस्थ गोकुळाष्टमीच्या दिवशी कान्होबा अंगात आल्यावर आपल्या मानाच्या हंड्या फोडत असतात. अशा प्रकारे आजही सुधागड तालुक्यात ग्रामीण भागात पूर्वीपासून चालत आलेली परंपरा नुसार आजही गोकुळ अष्टमी हा सण मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात साजरा केला जातो.

अवश्य वाचा

एमसीएफ आता दोन वर्षांचा

पालेभाज्यांच्या दरात घसरण