नवखार (कुर्डूस) गावचे शे. का. पक्षाचे खंदे कार्यकर्ते स्व. किसन शंकर कर्वे यांचे बुधवार दि. 14/08/2019 रोजी रात्री 11 च्या सुमारास उपचारासाठी अँब्युलन्समधून नेत असताना वडखळ च्या आसपास निधन झाले. किसन कर्वे नोकरी निमित्त आपल्या कुटुंबासहित मुंबईस स्थायिक झाले होते. रिटायर झाल्यानंतर दोघां उभयंता आपल्या गावी रहात होते. 

ते शे. का. पक्षाचे खंदे कार्यकर्ते होते. प्रत्येक इलेक्शनला मुंबईहुन गावी येऊन सोबतच्या कार्यकर्त्यांबरोबर खांद्याला खांदा देऊन काम करत होते. गावातील मुंबई स्थित असलेल्या ‘नवखार नवतरुण सेवा मंडळ, मुंबई’ चे ते दीर्घकाळ सेक्रेटरी होते. मंडळास उर्जितावस्था आणण्याचे मोलाचे योगदान ते सेक्रेटरी असतानाच्या काळात त्यांनी जनसेवा म्हणून केले.

एक संयमी व्यक्तिमत्व असलेली सर्व गावाची लाडकी आसामी काळाने हिरावून नेली. सर्व लहान थोरांशी हसत-खेळत राहून सर्वांच्या सुख-दुःखाच्या कार्यात हातभार लावून खारीचा वाटा निःसंकोचपण उचलत असत. गेली पंधरा वर्षे ते गावी राहून एक आदर्श शेतकरी बनले होते. सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत आपल्या धर्मचारिणी सोबत शेतात उन्हा तान्हात, पाऊस पाण्याची तमा न बाळगता राबत होते. त्यांची ईश्‍वरभक्ती वाखाणण्यासारखी होती. त्यांच्या डोळ्यापुढे सदैव ईश्‍वर मूर्ती असावी असा हव्यास होता. फक्त दोन-तीन दिवसाच्या सामान्य तापाच्या आजाराने त्यांना जनतेपासून ओढून नेले. त्यांच्या जाण्याने नवखार गावची अपरिमित हानी झाली आहे. 

त्यांच्या पःश्‍चात पत्नी, दोन मुलगे व दोन मुली असा परिवार आहे. त्यांचा तेरावा सोमवार दि. 26/08/2019 रोजी नवखार येथे राहत्या घरी होणार आहे. 

 

अवश्य वाचा

एमसीएफ आता दोन वर्षांचा

पालेभाज्यांच्या दरात घसरण