माणगांव

मुसळधार पावसाने संपूर्ण महाराश्ट्रात थैमान घातले. त्यामुळे सर्वच ठिकाणचे जनजीवन  विस्कळीत झाले. राज्यातील कोल्हापूर व सांगली जिल्हयाला मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे  मोठा फटका बसला. याठिकाणी अनेकंाची घरे वाहून अनेकजण बेघर झाले. तर काहींच्या दुकानात  पाणी षिरुन दुकानांचे  नुकसान झाले. तसेच अनेकजण पुराच्या पाण्यात वाहून गेले सांगली जिल्हयातील ब्रम्हनाळ गावांत बोट उलटून त्या दरम्यान 30 जण बुडून मृत्युमुखी पडले. या सांगली जिल्हयातील पुरग्रस्त वसगडे, खटाव, ब्रम्हनाळ, चोपडेवाडी, भिलवडी, सुकवाडी आदि गांवातील विद्याथ्र्यांना सामाजिक दृश्टीकोन नजरेसमोर ठेवीत सामाजिक बांधीलकीचा एक भाग म्हणून 5000 वहया, 1500 पेन, 1500 पट्टया, 1500 पेन्सिल, 1500 खोडरबर, 1500 षाॅपनर आषा प्रकारच्या षैक्षणिक साहित्यांचे वाटप त्या त्या गांवातील षाळेत  जावून  20 आॅगस्ट 2019 रोजी माणगांव निकम स्कूलचे प्राचार्य सतिश बडगुजर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक षरद मोरे, षिपाई नरेष पालकर यांनी केले. याकामी त्यांना वसगडे गांवातील गा्रमस्थ उमेद महम्मंद संयद यांनी मोलाचे सहकार्य केले. निकम स्कूलच्या या मदतीचे कोल्हापूर जिल्हयाचे खासदार संभाजी राजे यांनी विषेश कौतुक केले.   

पुरग्रस्तांच्या मदतीस षासनाबरोबर संपूर्ण महाराश्ट्ातील जनता, धावली आहे. विविध संस्था, संघटना, दानषूर व्यक्ती पुरग्रस्तांना मदतीचा हात देत आहेत. माणगांव येथील एस्. एस्. निकम इंग्लिष स्कूलचे सर्व संस्था चालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, सर्व षिक्षक वर्ग, सर्व षिक्षकेतर कर्मचारी वृंद  व  विद्यार्थी यांनी वर्गणी गोळा करुन पुरग्रस्त गांवातील विद्याथ्र्यांना षैक्षणिक साहित्यांच्या रुपाने बहुमोल मदतीचा हात दिला. सांगली जिल्हयातील वरील सर्व गांवातील परिस्थिती आजही बेताची असून येथील लोक येणा-या मदतीची आतूरतेने वाट पाहत आहेत. दानषूर व्यक्ती, संस्था संघटनानी या गांवाना सढळ हस्ते मदतीचा हात देणे गरजेचे आहे. 

अवश्य वाचा

एमसीएफ आता दोन वर्षांचा

पालेभाज्यांच्या दरात घसरण