खरोशी

     80 वर्षांपासून असलेली सातबारावरील नावे बदलून 14 कुटुंबातील 70 सभासदांची  सातबारा  उता-यावरील नावे उद्ध्वस्त केल्यामुळे 13ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालय  येथे उपोषण सुरू असून आज 12 व्या दिवशीही उपोषण चालू असून खरोशी येथील उपोषण कर्त्यानी महसूल अधिकारी यांनी केलेल्या अन्यायाविरोधात निषेधाची काळी  हंडी उपोषणाच्या ठिकाणी फोडली.

      यावेळी  उपोषण कर्त्यानी सांगितले की जर  न्याय दिला नाही तर  सर्व कुटुंबातील लहान थोर महिला आत्मदहन करणार असल्याचे खरोशीतील  गोपीनाथ महादेव पाटील  शांताराम महादेव पाटील नामदेव महादेव पाटील  नारायण पोशा पाटील प्रकाश लक्ष्मण पाटील यांच्यासह  हरीश बेकावडे व 14 कुटुबातील सभासदांनी सांगितले. 

          सविस्तर वृत्त असे की 80 वर्षांपासून कागदोपत्री कब्जे वहिवाटीने वडिलोपार्जित ताबा असताना येथे शेती पिकवून उदरनिर्वाह करीत असताना मागील चार पिढ्या सातबारावर आमच्या कुटुंबाची  नावे दाखवीत होती आता पाचव्या पिढीच्या वाट्याला आमची नावे दाखवित नसून सातबारा कोरा दाखवीत आहे त्यामुळे महसूल विभागाने आमच्या सर्वसामान्य शेतकरी बांधवांवर एक प्रकारे अन्याय केला आहे 2012 पर्यंत सातबारावर आमच्या कुटुंबाची नावे होती माञ आमची  सातबारावरची   नावे कमी करण्यात आली असून आमच्या 14 कुटुंबाच्या जीवावर बेतले आहे . त्यामुळे आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढा देऊ व महसूल अधिकारी यांनी केलेल्या अन्यायाविरोधात   त्या अधिका-यांवर कडक कारवाई केलीच पाहिजे असे हरीश बेकावडे व उपोषण कर्त्यानी सांगितले. 

अवश्य वाचा

एमसीएफ आता दोन वर्षांचा

पालेभाज्यांच्या दरात घसरण