सुतारवाडी दि. 24 

प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही सुतारवाडी नाक्यावर गोकुळाष्टमी उत्साही वातावरणामध्ये साजरी करण्यात आली. सकाळपासूनच बाळगोपाळांनी घरोघरी जाऊन गोविंदा रे गोपाळा चा नारा लावत आपल्या अंगावर पाणी घेतले. दुपारी खासदार सुनील तटकरे यांचे सुतारवाडी नाक्यावर आगमन झाल्या नंतर  गोविंदा मध्ये सहभागी झाल्यानंतर सुतारवाडी नाक्यावरून सुतारवाडी येथील दत्त मंदिरा पर्यंत गोविंदा नंतर पुन्हा सुतारवाडी नाक्यावर गोविंदा आल्यानंतर येथील दहीहंडी फोडण्यात आली. गोविंदा मध्ये सहभागी झालेले खासदार सुनिल तटकरे यांनी यावेळी सांगितले की मी दर वर्षी येथील गोविंदा मध्ये सहभागी होत असतो. गेल्या 42 वर्षापूर्वी दत्ताजीराव तटकरे आणि स्वातंत्र्यसैनिक बापूसाहेब रसाळ यांनी गोकुळाष्टमी आणि दसरा सणाची मुहूर्तमेढ या ठिकाणी रोवली. तेव्हापासून आजपर्यंत  गोकुळाष्टमी आणि दसरा सण मी  कधीही  चुकवत नाही. सामाजिक कामानिमित्त मी कोठेही असलो तरी गोकुळाष्टमी आणि दसरा सणासाठी येथे आवर्जून उपस्थित राहून दत्ताजीराव तटकरे आणि बापूसाहेब रसाळ  यांनी सुरू केलेली परंपरा आजतागायत तेवत ठेवली असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले. खासदार होण्यापूर्वी मा. सुनिल तटकरे यांनी मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आपल्या कुशल बुद्धीने यशस्वीपणे पार पाडल्या. मंत्री मंडळात व्यस्त असताना सुद्धा गेल्या 42 वर्षाची परंपरा त्यांनी खासदारकिच्या काळात तशीच अखंडपणे चालू ठेवली आहे.  याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले. खासदार सुनिल तटकरे यांचे सुतारवाडी येथील गोविंदा पथकात सहभागी होताच फटाक्यांची आतषबाजीने आणि ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले.

अवश्य वाचा

एमसीएफ आता दोन वर्षांचा

पालेभाज्यांच्या दरात घसरण