नेरळ

   नेरळ पोलिसांनी गावठी दारू बनविणाऱ्या हातभट्ट्या विरुद्ध आपली कारवाई पुन्हा एकदा सुरू केली आहे. गेली काही दिवस ही मोहीम थंडावलेली होती. शुक्रवारी नेरळ परिसरातील चिंचवाडी येथे पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली असून सुमारे 50 हजारांचा माल उध्वस्त केला आहे. 

           ययाबाबत नेेरळ पोलिसांकडूून मिळालेल्या माहिती नुसार नेरळ पोलिसांना आपल्या गुप्त बातमीदारामार्फत चिंचवाडीच्या जंगल भागात गावठी दारू बनविली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने नेरळ पोलिसांनी पथक नेमून महिच्या आधारे चिंचवाडीच्या जंगलात शोध घेतला त्यावेळी त्यांना त्या ठिकाणी गावठी हातभट्टी आढळून आली.  

       यावेळी नेरळ पोलिसांना 200 लिटर क्षमतेच्या 6 निळ्या प्लस्टिकच्या टाक्या. त्यात 150 लिटर प्रमाणे 900 लिटर एव्हडे नवसागर गूळ मिश्रित साहित्य. दगडाची चूल त्यावर पत्र्याच्या टाकीत नवसागर गूळ मिश्रित रसायन असा एकूण 47 हजार रुपये किमतीचा  गावठी दारू बनविण्याचा मुद्देमाल मिळून आला. आजूबाजूला शोध घेतला कुणी मिळून आले नाही त्यामुळे ही गावठी हटभट्टीची दारू नेरळ पोलिसांनी नष्ट केली. 

  याबाबत नेरळ पोलिसांनी गु.र.नं. क्रमांक 157/2019 महाराष्ट्र दारूबंदी 1949 चे अधिनियम कलम 65 (फ) अन्वये आरोपी भानुदास जानू कोकरे रा. चिंचवाडी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक  येरूनकर हे तपास करीत आहेत. 

 

अवश्य वाचा