नेरळ 

    कर्जत तालुक्यातील वारे ग्राम पंचायत हद्दीतील अंगणवाडी केंद्राचे मागील अनेक वर्षांपासून दुरावस्था झाली असून दरवाजे खिडक्या तुटल्या आहेत वारंवार निवेदने देऊनही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे .अंगणवाडी केंद्राच्या दुरावस्थे मुले येथे चिमुकल्याचे मात्र हाल होताना दिसत आहेत. तसेच अंगणवाडीतच पोषण आहार शिजविण्यासाठी गॅस शेगडी लावली असल्याने दुर्घटनेची ही शक्यता पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

      वारे अंगणवाडी केंद्राची इमारत 28  वर्ष जुनी असून 1991 साली बांधण्यात आली आहे या केंद्रात गावातील 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालके पूर्व प्राथमिक शिक्षण घेत आहेत .या शिवाय 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांचीही या केंद्र मार्फत नियमित देखरेख केली जाते.  परंतु आजतागायत या इमारतीची दुरुस्ती कडे दुर्लक्ष झाल्याने इमारतीची अवस्था बिकट झाली आहे .पावसाळी दिवसात खिडक्या तुटल्याने पावसाचे पाणी आत शिरत असून वर्ग खोलीत पसरत आहे .दर वर्षी प्लास्टिक च्या साहाय्याने तात्पुरता इलाज केला जातो परंतु त्याचा ही काही उपयोग होत नाही. दरवाज्याची ही अवस्था काहीशी अशीच आहे .

        विशेष म्हणजे मुख्य दरवाज्या बाहेरच गावातील रहदारीचा रस्ता असल्याने अपघातांची  शक्यता ही नाकारता येत नाही. खेदाची बाब म्हणजे मुलांचा पोषण आहार शिजविण्या साठी अन्य जागा नसल्याने केंद्रातच खिचडी शिजवली जाते .मुलांना खेळण्याच्या मोकल्या जागे अभावी स्वयंपाकाच्या ठिकाणीच गॅस सिलंडर च्या जवळच चिमुकली खेळताना दिसत आहे.दुर्दैवाने काही अघटित घडले तर मोठी दुर्घटना घडू शकते. अशीच स्थिती तालुक्यातील इतर अंगणवाडी केंद्राची ही पहावयास मिळत असून काही ठिकाणी तर इमारती अभावी मुलांना मंदिरात किंवा अन्य ठिकाणी बसविल्याचे ही निदर्शनात येत आहे .नवीन बांधण्यात आलेल्या इमारतीत पोषण आहार शिजविण्याची व्यवस्था असली तरी 20 /25 वर्ष जुन्या इमारतीत पोषण आहार शिजविण्या करीता स्वतंत्र जागा नसल्याने एकतर वर्गातच आहार शिजविले जाते किंवा सेविका आपल्या घरून पोषण आहार शिजवून आणत आहेत. 

       या संदर्भात वारे अंगणवाडी सेविकेने स्थानिक ग्रामपंचायत तसेच वरिष्ठ कार्यालयास या संदर्भात निवेदना द्वारे कळविले असून पोषण आहार शिजविण्या साठी वेगळी जागा उपलब्ध करून इमारतीची ही दुरुस्ती ही तातडीने करावी अशी विनंती केली आहे. शासन अंगणवाडी केंद्रासाठी जरी स्मार्ट उपाययोजना राबवित असले तरी मूलभूत भौतिक सुविधानपासून मात्र येथील बालकांना वंचित ठेवत असल्याचे चित्र दिसून येत आहे .

 

अवश्य वाचा