कर्जत -दि.24 

     रायगड जिल्हा परिषद सदस्य सुधाकर घारे यांच्या प्रयत्नातुन बिड ग्रामपंचायत हद्दीतील मौजे मोहिली येथील गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन संपन्न झाले.

    बिड ग्रामपंचायत हद्दीतील मौजे मोहिली येथील ग्रामस्थ व युवक यांच्या मागणीनुसार स्वतंत्र दिनाच औचित्त साधून गावातील विविध विकास कामांची पाहणी जिल्हा परिषद सदस्यसुधाकर घारे यांनी केली, पाहणी करीत असताना गावातील नागरिकांची प्रमुख मागणी पिण्याची पाण्याची समस्या दूर करावी, या साठी आपण तत्काळ निधी उपलब्ध करून आम्हास भेडसावणारी समस्या दूर करावी अशी विनंती केली. सुधाकर घारे यांनी तत्काळ आठवडा भरामधे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून आपणास भेडसावणारी समस्या दूर करेन हा माझा शब्द आहे. नेहमीच आपल्या विभागातील नागरिकांना विकासाचा दिलेला शब्द पाळणारे, आपल्या विभागाच्या विकासासाठी कटिबद्ध असणारे विकासपुरुष  सुधाकर  घारे यांनी आपला शब्द पूर्ण करून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला.

    मोहिली गावातील नळपाणीपुरवठा योजना दुरुस्ती करण्यासाठी 7 लक्ष रुपये, मोहिली गावातील अंतर्गत गटार करण्यासाठी 2 लाख 99 हजार रुपये या दोन कामाचे भूमीपूजन करण्यात आले तर मोहिली बौद्धवस्ती येथील सामाजिक सभागृहाचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य सुधाकर घारे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपस्थित सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, गावातील ग्रामस्थ व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

अवश्य वाचा