ठाणे  दि 23 

भारतात होणाऱ्या  एकूण रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात होणारे अपघात हे वाहनांच्या टायर्स ची कमी गुणवत्ता असल्यामुळे होत असल्याचे अनेकवेळा निदर्शनास आले आहे. त्यामुळे असे अपघात टाळण्यासाठी वाहनांचे टायर्स हे उत्तम दर्जाचे असणे गरजेचे आहे असे मत गुडीअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष राजीव आनंद यांनी सांगितले.  भारतीय बाजारपेठेत गुडियर ने अ‍ॅश्युरन्स ड्युराप्लस टू आणि रेंगलर एटी साइलेंटट्रॅक या दोन नवीन उत्पादनांची घोषणा आज केली त्यावेळी ते बोलत होते. 

ते पुढे म्हणाले की, “ एकट्या भारतात 2013 साली १ लाख ३७ हजार लोकांचा मृत्यू हा रस्ते अपघातात झालेला आहे. त्यातील १६ मुलांचा मृत्यू दररोज रस्ते अपघातात होतात. सरासरी  प्रत्येक मिनिटाला रस्ते अपघातात मृत्यू होतो असे अनेक सर्व्हेक्षण मध्ये स्पष्ट झाले आहे. रतर अपघातात मुंबई शहराचा पाचवा क्रमांक लागतो. केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाने २०१४ साली केलेला हा सर्व्हे आहे. या अशा रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात अपघात हे टायर फुटून झालेले आहेत. सन २०१४ मध्ये ९७४८ लोकांचा मृत्यू हा वाहनांचे टायर फुटून झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यात ३३७१ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर केंद्र सरकारने टायर बनविणाऱ्या कंपन्यांना टायर ची गुणवत्ता राखण्याचे आदेश दिले होता. मोदी सरकारच्या काळातही टायर फुटून झालेल्या अपघातांची दखल घेतली गेली. असेही राजीव आनंद यांनी सांगितले. या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या पसंतीस उतरणारे हे टायर्स चे उत्पादन गुडियर करीत असून नवीन उत्पादन हे लहान आणि मध्यम-आकाराच्या प्रवासी कारसाठी बनविण्यात आले आहे.  रॅंगलर एटी सायलेंट ट्रॅक या टायर्स मध्ये चाकांवर पूर्ण नियंत्रण ठेवण्याची क्षमता असून त्यामुळे अपघात कमी होण्यास मदत होणार असल्याचे गुडियर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव आनंद यांनी सांगितले.

 

अवश्य वाचा