रविवार, दि. 7 डिसेंबर 1945 रोजी सकाळी सात वाजून 55 मिनिटांनी जपानी विमाने पर्ल हर्बल या पॅसिफिक महासागरावर असणार्‍या अमेरिकेच्या नाविक तळावर येऊन धडकली. त्याक्षणी अमेरिकेला चीतपट केले हे खरे; पण त्यानंतर होणार्‍या परिणामांची कल्पना तेव्हा तरी उगवत्या सूर्याच्या देशातील या लोकांना नव्हती. पॅसिफिक महासागरातील अमेरिकेचे पर्ल हर्बर हे नाविक तळ नष्ट झाल्यानंतर अवघ्या जगाने तोंडात बोटे घालून आश्‍चर्याने पाहात राहावे अशी कामगिरी या देशाने केली. संपूर्ण आग्रेय आशिया पादाक्रांत करून ‘एशिया फॉर एशियन्स’ ही घोषणा करून युद्ध भारताच्या सीमेवर आणून इंग्रजांच्या साम्राजाला दिले. पण, जपानचा हा विजय म्हणजे जंगलात आग लागलेल्या एखाद्या वणव्याप्रमाणे ठरला. अल्पावधीत जपानची दोस्त राष्ट्रे इटली व जर्मनने शरणागती पत्करली. आग्नेय आशियातील सर्व प्रदेश त्यांच्याकडून गेले, तरीसुद्धा शरणागती पत्करायला जपानी काही केल्या तयार नव्हते. कारण, गेल्या 200 वर्षांत त्यांनी पराभव हा शब्दच ऐकला नव्हता. तेव्हा जपानवर अणुबॉम्ब या नवीन अस्त्राचा प्रयोग करायचे अमेरिकेन ठरवले. 

हिरोशिमा जपानचे एक उत्कृष्ट बंदर. पहिल्या प्रतीचे औद्योगिक व सुंदर आणि रमणीय शहर म्हणून ते प्रसिद्ध होते. युद्ध सुरु झाल्यापासून 5 ऑगस्टपर्यंत या शहरावर फक्त 12 बॉम्ब टाकले होते. त्यामुळे आपण विजयी आहोत अशाच थाटात येथील तीन लाख लोक वावरत होते. 6 ऑगस्टला सकाळी 6.51 वाजता शहरातील भयसूचक भोंगे वाजले. पण, लोकांना त्याचा नित्याचा सराव असल्याने त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. 8.15 वाजता मात्र पुन्हा एकदा भयसूचक भोंगे वाजू लागल्यानंतर हिरोशिमातील जपान्यांनी आकाशाकडे नजर टाकली, तेव्हा आकाशात घिरट्या घालत असलेले विमान दिसले. शत्रूचे विमान धोक्यात सापडले या आनंदाने ते पैजा लावत होते. पण, त्यानांतर मात्र काही सेकंदात काय होणार याची त्या बिचार्‍यांना कल्पना नव्हती. 

घिरट्या घालणारे ते अमेरिकेचे बी-29 या जातीचे ‘एनोला-जे’ विमान होते. या विमानात 10 फूट लांबीचा आणि 4100 किलो वजनाचा एक महाभयानक अल्टा (ङळीींंश्रश इेू) अणुबॉम्ब होता आणि बरोबर 8 वाजून 15 मिनीट 17 सेकंदांनी लिटिल बॉय होरोशिमावर आदळला आणि काही कळायच्या आत 70,000 माणसे कापरासारखी जळून जागीच ठार झाली. आपण कशामुळे मेलो हेसुद्धा त्या बिचार्‍यांना समजले नाही. आणि, त्यानंतर हिरोशिमात मृत्यूचे तांडव सुरु झाले. आई, वडील, भाऊ, बहीण, सर्व नाती गळून पडली. वाट फुटेल तिकडे लोक पळाले. सात हजार इमारती कापसासारख्या जळून खाक झाल्या. इमारतींच्या लोखंडी सळ्या वितळल्या. घरे पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. यात जे मेले ते सुदैवी; पण जे जगले त्यांनी काय पाहिले? तर अणुबॉम्बचा प्रताप! प्रखर प्रकाशाकडे पाहिल्यामुळे हजारोंचे डोळे गेले. आवाजाने तितकेच बहिरे झाले. भाजल्यामुळे कित्येकांची चामडी मांसापासून सोलून बाहेर लोंबत होती. हजारोंचे केस जळाले. स्त्री कोण, पुरुष कोण, हे समजत नव्हते. त्यानंतर ताशी शेकडो मैल वेगाने गरम वारे शहरभर वाहू लागले. त्यामुळे प्रचंड आगी लागल्या. उष्णता तर इतकी भयानक, की हिरे, मोती वितळून कोळसे झाले. मग एक चमत्कारीक घटना घडली. गारगोटीपेक्षाही मोठे थेंब असणार्‍या एका विचित्र पावसाचे आगमन झाले. या पावसाचे पाणी लोक प्यायल्यामुळे त्यांचा तडफडून मृत्यू झाला. 

अणुबॉम्बमुळे सव्वा लाख ठार, ऐंशी हजार जखमी, तर हजारो बेपत्ता झाले. अशा प्रकारची भीषण हत्या मानवाच्या इतिहासात गेल्या दहा हजार वर्षांत झाली नव्हती व पुढच्या दहा हजार वर्षांत होणार नाही. 

आजही जगात अनेक राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये हेवेदावे आहेत. प्रसंगी छोटी-मोठी युद्धेही होतात. पण, कोणी कोणावर अणुबॉम्ब टाकत नाही. 50 वर्षांपूर्वीच्या प्राथमिक अवस्थेतील अणुबॉम्बने एवढी भयानक हानी केली. तर मग...

 

(सौजन्य ः सहज शिक्षण यू ट्यूब वाहिनी)

दिनांक 6 ऑगस्ट 2019 

आजचे इतिहासातील इतर दिनविशेष : 

1)1697- चार्लेस सातवा, रोमन राजा यांचा जन्म दिन. 

2)1881- पेनिसिलिनचे संशोधन अलेक्झांडर फ्लॅमिंगो यांचा  जन्म. 

3)1930- फ्रेंच रसायन शास्त्रज्ञ जोसेफ ला बेल यांचे निधन. 

4)1983- अणुशक्ती मंडळाच्या अध्यक्षपदी राजा रामण्णा यांची निवड. 

5)2003- टाटा इंडिकॉमच्या मोबाइल सेवेचा मुंबईत प्रारंभ.

अवश्य वाचा

एमसीएफ आता दोन वर्षांचा

पालेभाज्यांच्या दरात घसरण