चिपळूण : लायन्स आणि लायनेस क्लब तर्फे ज्येष्ठ लायन्स सदस्य अनिल देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरिय बुद्धिबळ स्पर्धा १८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती. 

          स्पर्धेचे उदघाटन जितेंद्र जोशी डिस्ट्रीकट गव्हर्नर बार्शी यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी डिस्ट्रीकट चेअरपर्सन सुहास निकम,अनिल देसाई,अरुण कदम,प्रांजल गुंजोटे, लायन्स चिपळूण अध्यक्ष राजेंद्र वेस्वीकर ,लायनेस अध्यक्षा सौ चेतना होमकर,सेक्रेटरी जगदीश वाघुले,विजय ओसवाल,चंद्रकांत मांडवकर,सौ सीमा चाळके, सोनल कारेकर,सुनील पाटील,रश्मी सावर्डेकर,सिद्धेश लाड,स्वाती देवळेकर,अंजली कदम,नेत्रा रेळेकर,अलका सुराणा, श्रुती सावर्डेकर, आदी सदस्य तसेच स्पर्धक व पालकवर्ग उपस्थित होते.जागतिक स्तरावर लोकप्रिय अशा बुद्धिबळ खेळाचा प्रचार आणि प्रसार यानिमित्ताने व्हावा असा उद्देश असल्याचे लायनेस अध्यक्षा चेतना होमकर यांनी याप्रसंगी सांगितले.

युनायटेड इंग्लिश स्कूल मध्ये आयोजित ही

स्पर्धा खुला गट व शालेय गट(१ ते ४ थी / ५ ते ७ वी / ८ ते १० वी) आशा वेगळ्या गटात खेळविण्यात आली.

         यामध्ये शालेय गट १ पहिली ते चौथी मध्ये श्री गुढेकर प्रथम , अर्णव शिंदे द्वितीय,ईशान बापट तृतीय,आर्या तलाठी चतुर्थ ,तर गट २ - पाचवी ते सातवी मध्ये स्वस्तिक धुमाळ प्रथम ,चिन्मय होमकर द्वितीय ,विराज खामकर तृतीय ,तनिष शिरगावकर चतुर्थ ,तर गट 3 - आठवी ते दहावी मध्ये ओंकार सावर्डेकर प्रथम ,कबीर जाधव द्वितीय,किरण ओली तृतीय ,अभिजित जावले चतुर्थ क्रमांक मिळविले यांना रोख रक्कम आणि चषक देऊन गौरविण्यात आले .

         तर खुल्या गटात प्रवीण सावर्डेकर प्रथम,किशोर माने द्वितीय ,वरद पेठे तृतीय क्रमांकाने विजयी झाले.वयोवृद्ध खेळाडू विजय गिडयेना गौरविण्यात आले.महिलांमध्ये आस्था परदेशी प्रथम, श्रावणी खेडेकर द्वितीय, श्रावणी लटपटे तृतीय क्रमांकाने विजयी झाले.

    संपूर्ण स्पर्धेचे यशस्वी आयोजन बुद्धीबळचे राष्ट्रीय खेळाडू प्रविण सावर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.या स्पर्धेत जिल्ह्यातून एकूण १२० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.आंतरराष्ट्रीय पंच शार्दूल तपासे,आनंदीका प्रदीप यांनी पंच म्हणून कामगिरी केली.तर संपूर्ण स्पर्धेचे उत्तम सूत्रसंचालन सौ मीरा पोतदार यांनी केले .

अवश्य वाचा

एमसीएफ आता दोन वर्षांचा

पालेभाज्यांच्या दरात घसरण