पद्मशाली समाजातील अभियंत्यांनी एकत्रित येऊन पद्माशाली इंजिनिअर्स असोसिएशनची स्थापना केली. या असोसिएशनच्या माध्यमातून समाजाच्या उन्नतीसाठी आणि विकासासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष व वसंतराव येमूल यांनी केले. 

एमआयडीसी येथील सत्य विजय कन्व्हेशन सभागृहात नुकतेच पद्मशाली इंजिनिअर्स महामेळावा घेण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सुरुवातीला राष्ट्रगीताने तसेच श्री मार्कंडेय महामुनी व मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महामेळाव्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी मेळाव्याचे अध्यक्षस्थानी अध्यक्ष तथा स्ट्रक्चरल इंजिनिअर जगदीश दिड्डी, सचिव प्रा. रोहन कुर्री, कार्यक्रमाचे संयोजक आर्किटेक्ट चंदुलाल अंबाल, यशवंत इंदापुरे उपस्थित होते.ते पुढे म्हणाले, पद्मशाली समाजातील अभियंत्यांनी आपल्या कार्याद्वारे दिशा द्यावी, सक्षम उद्योग उभे करावेत, त्याचबरोबर समाजविकासासाठी सहकार्य करीत यशाची वाटचाल करावी. पद्मशाली समाजाच्या उन्नतीसाठी आणि समाजातील इंजिनिअर्स व आर्किटेक्टच्या सर्वांगिण विकासासाठी पद्मशाली इंजिनिअर्स असोसिएशन अर्थात पीईएची स्थापना झाली. या कार्याला त्यांनी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मध्यप्रदेशातील भोपाळचे कमिशनर व प्रॉडक्शन इंजिनिअर नरहरी परकीपंडला यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी ज्येष्ठ अभियंता व वास्तुविशारदांचा तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी इंजिनिअरर्स असोसिएशनचे उद्दिष्टे आणि वाटचाल सर्वांना कळावे म्हणून थथथ.शिर.ेीस.ळप वेबसाईटचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच टेक्नोक्रेटस् या पहिल्या बुलेटिनचे प्रमुख पाहुण्यांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले. या मेळाव्यास उपाध्यक्ष विरेंद्र बोलाबत्तीन, प्रवीण चिलवेरी, सहसचिव विनील कोंगारी, अनिल अवधतू, पीआरओ प्रशांत मुशन तसेच समाजातील अशोक इंदापुरे, श्रीनिवास इप्पाकायल, सोमनाथ इंदापुरे तसेच 400 ते 450 पद्माशाली इंजिनिअर्स उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनायक सामलेटी, अमित देवसानी, अमर कोटा, श्रीनिवास कंची, महेश सामल, गाजूल आणि इंजिनिअरिंग विभागातील विद्याक्र्ष्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुजा सुंचू आणि पल्लवी गुर्रम यांनी केले तर आभार खजिनदान चंदूलाल अंबाल यांनी मांडले.

अवश्य वाचा