जागतिक खेळाडू संदीप प्रल्हाद गुरव यांचा आज ७३ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अलिबाग येथील पोलीस परेड मैदानात घेण्यात आलेल्या जिल्ह्याच्या मुख्य प्रशासकीय कार्यक्रमात गौरव करण्यात आला. गुरव हे दिव्यांग खेळाडू असून व्हीलचेअर तलवारबाजी खेळात अलिकडेच महाराष्ट्र शासनाकडून क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च असा एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला होता. व्हीलचेअर तलवारबाजी खेळात एकलव्य राज्य पुरस्कार मिळवणारे गुरव हे महाराष्ट्राचे तसेच रायगडचे पहिले खेळाडू असून त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन स्वातंत्र्यदिनी नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांचे हस्ते गुरव यांचा गौरव करण्यात आला. यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांचेसह रायगडचे क्रीडा अधीकारी व इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते. संदीप गुरव १५ ते २४ सप्टेंबर दरम्यान दक्षिण कोरियात होणाऱ्या जागतिक व्हीलचेअर तलवारबाजी स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार असून उपस्थित मान्यवरांकडून गुरव यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

अवश्य वाचा

एमसीएफ आता दोन वर्षांचा

पालेभाज्यांच्या दरात घसरण