अलिबाग

शिक्षणातून व अभ्यासक्रमातून प्रकट होणारे विचार निश्चितच येणा-या भविष्यकालीन समस्यांचे निराकरण व उत्तम जीवन जगण्यासाठी दिशादर्शक ठरतील, मानवी जीवनात शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे असले तरी दर्जेदार शिक्षणासमवेत कला, क्रिडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी अग्रेसर असले पाहिजे, तसेच सर्व स्पर्धांमध्ये पीएनपी महाविद्यालय नेहमीच अव्वल असले पाहिजे असे प्रतिपादन पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी सत्कार प्रसंगी केले. पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या वेश्वी येथील मुख्यकार्यालयात सदर कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. त्या वेळेस चित्रलेखा पाटील बोलत होत्या.

सदर कार्यक्रमात मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग ४२ महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे युनिट मधून रायगड विभागातून सन २०१८–१९ करीता प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयाला उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना युनिट हा पुरस्कार प्राप्त झाला आहे तर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. रविंद्र पाटील यांना रायगड जिल्ह्यातून उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी हा पुरस्कार प्राप्त झाला, त्याच प्रमाणे नुकताच संपन्न झालेल्या युवा महोत्सवात विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेवून विजेते झालेले स्पर्धकांचा सन्मान आणि अनेक राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत अंतिम विजेती ठरलेली ऋतुजा सकपाळ आदी विद्यार्थ्यांचा सन्मान चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी पीएनपी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या संजीवनी नाईक आणि इतर प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

अवश्य वाचा

एमसीएफ आता दोन वर्षांचा

पालेभाज्यांच्या दरात घसरण