श्रीवर्धन 

श्रीवर्धन येथील गोखले महाविद्यालय आणि क्रीडा परिषद, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच श्रीवर्धन तालुका स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न झाल्या. त्यामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी पं.स.सभापती सौ. मीना कुमार गाणेकर, उप सभापती बाबुराव चोरगे, पं. स. सदस्यसौ.सुप्रिया गोवारी, मंगेश कोमनाक, जि. प. सदस्या सौ. सायली तोंडलेकर व सौ. प्रगती अदावडे, ग. वि. अधिकारीश्री. भोगे, ग. शि. अ. श्री. राऊत, प्राचार्य डॉ. श्रीनिवास जोशी, उप प्राचार्य प्रा. सुभाष भोसले आदि उपस्थित होते.प्रा. नवज्योत जावळेकर यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते. प्रो. पी. जे. देवरे, प्राचार्य, उप प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

      स्पर्धेत 17 वर्षे वयोगट मुले (गोखले कॉलेज) यांना प्रथम क्रमांक व किसान हायस्कूल, वालवटी यांना द्वितीय क्रमांक मिळाला. तर 19 वर्षे वयोगटात गोखले कॉलेजच्या मुलांना प्रथम क्रमांक तर र. ना. राऊत कनिष्ठ महाविद्यालयमुलांना दुसरा क्रमांक मिळाला. 

अवश्य वाचा