हल्ली दहीहंडी म्हटले की उंचच्या उंच हंड्या आणि त्या फोडण्यासाठी प्राण पणाला लावून प्रयत्न करणारे गोविंदा पथक नजरे समोर येतात. खरे तर भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या बालपणीच्या प्रसंगाची आठवण म्हणुन श्रीकृष्णाप्रमाणेच अगदी दोन थराची दहीहंडी बांधून ती आपल्या मित्रमंडळी सोबत फोडून हा उत्सव साजरा करण्याची प्रथा सूरू झाली होती. पण हल्ली या पवित्र उत्सवाचा मूळ उद्देशच नष्ट होत चालला आहे. त्यात आणखी एक भर म्हणजे महिलांची दहीहंडी ! द्वापारयुगात बालगोपाळांसह गोपिकांनीही दहीहंडी फोडल्याचे कधी कुठे वाचनात आलेले नाही ना श्रीकृष्णाच्या जीवनावरील मालिकांमध्ये हे दाखवण्यात आले. मग ही महिला दहीहंडी सुरु करण्याला नेमका आधार तरी काय ? हल्ली प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन कार्य करत आहेत. पण याचा अर्थ असा नव्हे की एखाद्या गोष्टीमागील शास्त्र विसरून केवळ मौजमजा म्हणुन आपण उत्सवाचा मूळ उद्देशच समाप्त करावा. आज या उत्सवाकडे आपण केवळ मौज मजा म्हणून पाहिले तर येणारी पिढीही त्याकडे वर्षातून एकदा खेळला जाणारा करमणुकीचा खेळ म्हणूनच पाहिल.  

 

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास