गेल्या काही वर्षांपासून दहीहंडीच्या निमित्ताने शहरांसारख्या ठिकाणी मोठं मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. ठराविक थर लावण्यासाठी बक्षिसांची खैरात केली जाते. गर्दी जमवण्यासाठी डीजे लावले जातात, नाचण्यासाठी नट-नट्यांना निमंत्रित केले जाते, मोठ्या आवाजात सिनेमातील गाणी लावली जातात, पाणी फवारण्यासाठी मोठमोठे टँकर मागवले जातात, एकूणच हल्लीच्या तरुणाईला थिरकण्यासाठी पोषक वातावरण तयार केले जाते. खरेतर गोपाळकाला हा हिंदू धर्मातील एक पवित्र उत्सव असून त्यामागील शास्त्र जाणून घेऊन तो तशाप्रकारे साजरा केला तर भक्तांना त्याचा अपेक्षित लाभ होतो; मात्र दिवसागणिक उत्सवांचे होत असलेले बाजारीकरण पाहता या सर्वांमधून धार्मिकता पुरती लोप पावल्याचे दिसून येते. हिंदू धर्मातील सण उत्सव हे मौजमजेसाठी नसून आनंदप्राप्तीची ती साधने आहेत. त्यांचे पावित्र्य जपणे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे यंदा गोपाळकाला साजरा करताना हा भागही लक्षात असू द्या !

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास