स्नेह आणि प्रेमाची देवाणघेवाण करणाऱ्या धार्मिक उत्सवांमध्ये गैरप्रकारांचा शिरकाव झाल्यामुळे उत्सवाचा मूळ उद्देश बाजूला सरू लागला आहे. नवरात्रोत्सवाप्रमाणे आता दहीहंडी उत्सवाचेही व्यापारीकरण होऊ लागले आहे. शहरांतील मोठ्या बक्षिसांच्या दहीहंड्यामध्ये राजकीय पक्षांची आणि धनदांडग्या व्यापाऱ्यांची मक्तेदारी वाढली आहे. दहीहंडी फोडण्यापेक्षा थरावर थर उभारून सलामी देणे आणि ठरलेले बक्षीस घेऊन जाणे हाच प्रकार सर्वत्र पाहायला मिळतो. मोठे स्टेज उभारून त्यावर चित्रपटसृष्टीतील कलाकारांना आणून नाचवले जाते, त्यामुळे जमणाऱ्या बघ्यांचे दहिहंडीपेक्षा या कलाकारांकडेच अधिक लक्ष असते. यामध्येही अधिक गर्दी जमवण्यासाठी बॅनरबाजींपासून बक्षिसांच्या रकमेपर्यंत प्रचंड चढाओढ चाललेली पाहायला मिळते. सवंगड्यांच्या शिदोरीरीतील पदार्थ एकत्र करून त्याचा काला तयार करायचा आणि तो सर्वांमध्ये समान वाटून खायचा म्हणजेच सारे भेदभाव विसरून एकत्र आनंदाने राहायचे ही शिकवण या उत्सवाच्या माध्यमातून श्रीकृष्णाने आपल्याला दिली, मात्र दहीहंडी उत्सवातील हल्लीची चढाओढ पाहता हा उद्देशच पूर्ण लोप पावल्याचे दिसून येते.   

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास