मुरुड तालुक्यातील मजगावच्या नज अॅकॅडमी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.ग्रीष्मा सोमप्रकाश राऊळ शिकाई मार्शल आर्ट या कराटे प्रकारात ठाणे जिल्ह्यातील पालघर येथे होणार्या विभागीय स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
 
           रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभाग आयोजित पावसाळी क्रीडा स्पर्धा 2019 च्या सिकाई मार्शल आर्ट स्पर्धेत माणगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत ग्रिष्माला प्रथम क्रमांक मिळाल्याने तिची निवड पालघर येथे होणार्या विभागीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे .
 
       ग्रिष्मा नज हायस्कूल मजगाव या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इ.8वीमध्ये शिकत आहे.तिला विजय तांबडकर यांनी मार्गदर्शन केले.तर क्रीडा शिक्षक आशिष बुल्लु यांनी सहकार्य केले.नज विद्यालयाचे प्रमुख शफीभाई तांडेल, वसिम तांडेल सर्व संचालक मंडळ ,मुख्याध्यापिका मेघा भंडारे,पर्यवेक्षिका उषा साखरकर व सर्व शिक्षक ,कर्मचार्यांनी ग्रिष्माचे अभिनंदन केले.

अवश्य वाचा