संपूर्ण मुंबईसह, रायगड व रत्नागिरी येथे गेल्या १२ वर्षांमध्ये सर्वात जास्त बँकिंगसह, रेल्वे व अन्य केंद्र सरकारी विभागांमध्ये सर्वात जास्त अधिकारी देणाऱ्या विकास सावंत अकॅडेमिने रविवार दि १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आदर्श पतसंस्थेंचा सभागृह, दुसरा मजला, श्रीबाग नंबर ३, अलिबाग येथे यूपीएससी व एमपीएससी या उच्चतम मानल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन केले आहे. या मार्गदर्शन सत्रासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून समाधान जाधव, करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी, नगर परिषद, अलिबाग हे मार्गदर्शन करणार आहेत शिवाय त्यांनी पोलीस उपनिरीक्षक म्हणून देखील सेवा केलेली आहे.

कोकणातील मुलांमधील असणारी हुशारी, गुणवत्तेला विकास सावंत अकॅडेमिने योग्य मार्गदर्शनाची जोड दिली आणि २०१० पासून अलिबाग सारख्या ग्रामीण भागातून विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून गेल्या ९ वर्षात ३४० हुन अधिक अधीकारी आज बँकिंग, रेल्वे तसेच केंद्र सरकारी विविध विभागांमध्ये स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पाठविले. खरंतर आज कोकणातील मुलांना पदवीचे शिक्षण घेत असतानाच यूपीएससी व एमपीएससी सारख्या उच्चतम मानल्या जाणाऱ्या परीक्षांचे योग्य मार्गदर्शन मिळाले तर कोकणातील मुलेही या परीक्षांद्वारे इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, इंडियन फॉरेन सर्विसेस, इंडियन पोलीस सर्विसेस तसेच अन्य सर्विसेसबरोबरच, उपजिल्हाधीकारी, पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक विक्रीकर आयुक्त, जिल्हा उपनिबंधक, तहसीलदार यासारख्या शासनाच्या विविध विभागांमध्ये उच्च पदावर कार्यरत झालेली पाहायला मिळतील. म्हणूनच आज विकास सावंत अकादमी पुढे हे पाऊल उचलत आहे. या साठी मुंबई व पुणे येथील त्यांचे तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक यापुढे अलिबाग मध्ये येऊन मुलांना मार्गदर्शन करणार आहेत. विविध विषयांचे सखोल मार्गदर्शन, परिक्षभिमुख दृष्टिकोन, दर्जेदार व अद्ययावत नोट्स आणि भरपूर सराव चाचण्या हे या अभ्यासवर्गाचे वैशिष्ट्य राहणार आहे. एकूणच या परीक्षांबद्दल संपूर्ण मार्गदर्शन व्हावे म्हणूनच या मोफत मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या संधीचा व होणाऱ्या मार्गदर्शनाचा जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ८६५२२२१९८८ या क्रमांकावर संपर्क साधावा. 

 

अवश्य वाचा

म्हसळा येथे माघी गणेशोत्सव