नवी मुंबई 14 आॅगस्ट 2019

मुंबई विदयापीठ संलग्न 700 पेक्षा जास्त काॅलेज आहेत. त्यापैकी पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे आणि रायगड जिल्हयात संस्कृत आणि पाली भाषेत पदवी शिक्षण देणारे सत्याग्रह महाविदयालय, खारघर, नवी मुंबई हे एकमेव महाविदयालय आहे. मुंबई आणि मुंबई उपनगरात केवळ 04 महाविदयालयात या विषयातील शिक्षणाची सोय आहे. म्हणून महाराष्ट्र पाली भाषा साहित्य परिषद आणि सत्याग्रह महाविदयालयाच्या संयुक्त विद्यमानाने एप्रिल-मे 2019 मध्ये 75 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करून पदवी पास झालेल्या सर्व विदयाथ्र्यांना रू. 10 हजार, भारतीय संविधान , सन्मान चिन्ह आणि पुष्नगुच्छ देवून सन्मान करण्यात येणार आहे असे संस्कृत, पाली भाषा विभाग प्रमुख प्रा. मंगेश कांबळे यांनी सांगितले. तसेच सत्याग्रह महाविदयालयातील 60 टक्के पेक्षा जास्त गुण घेवून प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्ष पदवी वर्गात शिकणाÚया सर्व विदयाथ्र्यांना वार्षिक रू. 05 हजार प्रोत्साहनपर संस्थेच्यावतीने रोख, संविधान, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देवून सुप्पारक भवन, प्लाॅट नं. 52, सेक्टर 19, खारघर, नवी मुंबई येथे पाली भाषेचे संशोधन मार्गदर्शक प्रा. एम. सत्यपाल महाथेरो यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डाॅ.जी.के. डोंगरगांवकर आहेत. हा कार्यक्रम ध्वजारोहण झाल्यानंतर दुपारी 11.30 वाजता करण्यात येणार आहे असे प्रा. वनिता सुर्यवंशी, प्रा. संगिता जोगदंड यांनी कळविले आहे. 

 

अवश्य वाचा

अर्थसंकल्पाचे संकेत

रेल्वेची घसरण