स्वातंत्र्यदिनाला अगदी काहीच दिवस शिल्लक राहिल्याने बाजारात राष्ट्रध्वजाच्या रंगाचे टी-शर्ट, केक, पंजाबी ड्रेस, साड्या  मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले आहेत . राष्ट्रप्रेम दर्शवण्यासाठी आपण ते खरेदीही करतो. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी परिधान घालतो; मात्र अंतर्मूख होऊन कधी स्वत:च्या मनाला प्रश्‍न विचारा की 'हे योग्य आहे का ?' तिरंगी दुपट्टा व साडी घातल्याने कधी हिरवा रंग वर व केशरी रंग खाली, असे चित्र दिसते. राष्ट्रीय सणांच्या दिवशी परिधान करण्यात येणारे राष्ट्रध्वजाप्रमाणे असणारे कपडे नंतर आपण कसे वापरतो, कसे टाकतो याचा विचार केला तर यातून राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याचे कोणत्याही सुजाण नागरिकाच्या लक्षात येईल. कपडे किंवा अन्य वस्तूंसाठी राष्ट्रध्वजासम रंग वापरणे हा ध्वजसंहितेनुसार गुन्हा आहे. त्यामुळे फॅशन म्हणून  राष्ट्रध्वजाच्या रंगाचे कपडे वापरू नयेत, चुकून अथवा जाणीवपूर्वकही आपल्याकडून राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता आपण प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी घेणे गरजेचे आहे. 

 

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास