मुंबई

इन्व्हेस्ट इंडिया आणि व्हॉट्सॲप तर्फे नुकतीच त्यांच्या ‘ स्टार्ट अप इंडिया- व्हॉट्सॲप ग्रॅन्ड चॅलेंज’ या स्पर्धेअंतर्गत पहिल्या पाच विजेत्यांना प्रत्येकी ३५ लाखांचे अनुदान प्रदान करण्यात आले.  मुंबईतील स्टार्ट अप जाविस या कंपनीने व्हॉट्सॲप बेस्ड एआय मंचाचा वापर करून योग्य लोकांबरोबर जोडणी करत योग्य माहिती मिळवून व्यवसाय प्राप्त केल्याने ही कंपनी पहिल्या पाच विजेत्यांपैकी एक बनली आहे.  

जाविसची सुरूवात ही पार्थसारथी सिन्हा यांनी करून एआय प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे.  यामुळै अधुनिक उपाय प्राप्त होऊन व्यवसायातील रोजच्या समस्यांवर मात करणे शक्य होणार असून या मंचामुळे आता सामाजिक आणि आर्थिक अशा वातावरणावर परिणाम घडवणे शक्य होणार आहे.  या मंचाचा हा अनोखा लाभ आहे.  यामुळे त्यांना रोज सरासरी ३-४ वैयक्तिक अडचणी येत असून सध्या त्यांच्याकडे १५०० वापरकर्ते आहेत.  १ जुलै रोजी सुरू केलेल्या या उपक्रमातून आता १५ हजार फूटवेअर आऊटलेट्स सुरू करण्यात आली आहेत. 

जाविस चे संस्थापक हे ग्रॅन्ड चॅलेंज च्या पाच विजेत्यांपैकी एक असून पार्थसारथी सिन्हा यांनी व्हॉट्सॲप आणि स्टार्ट अप इंडियाचे आभार मानले.  छोट्या व्यवसाय आता या मंचामुळे एकत्र येऊन आपले कौशल्य समोर आणू शकलेले आहेत.  पार्थसारथी यांनी पुढे सांगितले की ही अनुदानाची रक्कम त्यांच्यासाठी खूपकाही आहे आणि त्यामुळे त्यांना आता वाढीच्या पुढच्या टप्प्यासाठी मदत होणार आहे.

स्टार्ट अप इंडिया ग्रॅन्ड चॅलेंज च्या विजेत्यांची घोषणा केल्यानंतर व्हॉट्सॲप इंडिया चे प्रमुख श्री. अभिजीत बोस यांनी सांगितले “ भारतात अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना असल्याने त्याचा समाज आणि अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतांना दिसतो. व्हॉट्स ॲप मध्ये पुढील पिढीला तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण उपयोग करून भारतीय आणि जगभरांतील लोकांचे जीवन सुखकर करतांना अतिशय आनंद होत आहे.  मी विजेत्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या संकल्पना सत्यात उतरोत अशी सदिच्छा व्यक्त करतो.”

अवश्य वाचा

म्हसळा येथे माघी गणेशोत्सव