सांगली, दि. 13, 

सांगली जिल्ह्यातील पूरबाधितांना वेळेवर उपचार होण्याची गरज असल्याकारणाने पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे तसेच मेडिकल कँपमध्ये 10 हजारपेक्षा अधिक पूरबाधितांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले.

यापैकी विविध ठिकाणच्या मेडिकल कॅम्पमध्ये एकूण 8 हजार 187 रुग्ण तपासले गेले. तर सांगली व मिरज शासकीय रुग्णालयातील बाह्य रूग्ण विभागामध्ये 2 हजार 119 रुग्ण तपासण्यात आले. असे शासकीय वैद्यकीय पथकांकडून एकूण 10 हजार 306 रूग्णांवर उपचार करण्यात आले. यापैकी 175 रुग्ण दाखल झाले असून त्यामधील 84 रुग्णांवर ऑपरेशन करण्यात आले आहे. दोन रुग्ण गंभीर आहेत. तर 4 मृतदेह शवविच्छदनासाठी आले आहेत. ही माहिती अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.

डॉ. पल्लवी सापळे म्हणाल्या, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे आज वैद्यकीय शिबिरामध्ये 2 हजार 692 पूरबाधितांची तपासणी करण्यात आली. तर शासकीय रूग्णालयाच्या बाह्यरूग्ण विभागात 408 पूरबाधितांची तपासणी करण्यात आली. दि. 12 ऑगस्ट रोजी 13 रुग्ण दाखल झालेले असून 23 शस्त्रक्रिया पार पडल्या.

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.