चिपळूण 

अतिवृष्टीमुळे काही दिवस चिपळूण बाजारपेठेतील भाजी व्यापार ठप्प होता. मात्र, आता पावसाने विश्रांती घेतल्याने भाजी व्यापार पूर्वपदावर येऊ लागला आहे. तर भाजीचे दरदेखील बऱ्यापैकी आहेत, अशी माहिती महर्षी कर्वे भाजी  व्यापारी संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ भाजी व्यापारी सुधीर शिंदे यांनी दिली.   

जुलैच्या शेवटच्या आठवड्यात व ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात चिपळुणात जोरदार पाऊल पडला. इतकेच नव्हे तर येथील जनजीवन विस्कळीत झाले. तर दुसरीकडे चिपळूण - कराड मार्ग ठप्प होता. तसेच आता सांगली- कोल्हापूर जिल्ह्यात महापूर स्थिती आहे. याचा परिणाम चिपळुनातील भाजी व्यापारावर झाला. यामुळे काही दिवस चिपळूणला भाजी माल आला नाही तर जो होता चढ्या दराने विकला जात होता. मात्र, आता भाजी माल चिपळुणात येऊ लागला असून वांगी 10 ते 20 रुपये किलो, टोमॅटो 10 ते 20 रुपये, कोबी 10 ते 15, सिमला मिरची 10 ते 20, लांब मिरची 20 ते 40 रुपये, काकडी 30 ते 305 रुपये, फ्लॉवर 10 ते 20 रुपये, कमी पाला फ्लॉवर 30 रुपये, इंदूर बटाटा 15 रुपये असे दर आहेत, अशी माहिती भाजी व्यापारी सुधीर शिंदे यांनी दिली.

 

अवश्य वाचा

रेल्वेची घसरण