पाली दि १२ ऑगस्ट १९

      महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचनालय अंतर्गत रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जांभुळपाडा येथील आत्मोन्नती विद्यामंदिर मध्ये तालुकास्तरीय मुले आणि मुलींच्या खो खो चे सामन्यांमध्ये संत नामदेव विद्यालयाने तीन संघांचे प्रथम क्रमांक पटकाविले आहेत. यामुळे संत नामदेव विद्यालयाचे शारीरिक शिक्षणाचे शिक्षक संभाजी ढोपे व  विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विजयी संघांना प्राचार्य माणिक धर्माधिकारी, क्रीडा व्यवस्थापक बापू जगताप तर पंच म्हणून संभाजी ढोपे, राजू पिंजारी, टी.डी.कदम, सुभाष कदम, तृप्ती साने, विश्वास ढोपे, सुनील दिघे, पर्यवेक्षक के.डी. पिंगळे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले.

      सुधागड तालुका स्तरीय मुलांच्या खो-खो स्पर्धेत विजयी संघ वयोगट १४ मध्ये प्रथम  क्रमांक संत नामदेव माध्यमिक विद्यालय ,नांदगाव व द्वितीय क्रमांक ग. बा. वडेर हायस्कूल आणि व.ग.ओसवाल कनिष्ठ महाविद्यालय,पाली. वयोगट १७ मध्ये प्रथम  क्रमांक संत नामदेव माध्यमिक विद्यालय ,नांदगाव व द्वितीय क्रमांक आत्मोन्नती विद्यामंदिर जांभुळपाडा तर वयोगट १९ प्रथम क्रमांक ग. बा. वडेर हायस्कूल आणि व.ग.ओसवाल कनिष्ठ महाविद्यालय,पाली यांनी  मिळविला.

      तसेच सुधागड तालुका स्तरीय मुलींच्या खो-खो स्पर्धेत विजयी संघ वयोगट १४ मध्ये प्रथम  क्रमांक संत नामदेव माध्यमिक विद्यालय ,नांदगाव व द्वितीय क्रमांक आत्मोन्नती विद्यामंदिर जांभुळपाडा , वयोगट १७ मध्ये प्रथम क्रमांक आत्मोन्नती विद्यामंदिर जांभुळपाडा  व द्वितीय क्रमांक ग. बा. वडेर हायस्कूल आणि व.ग.ओसवाल कनिष्ठ महाविद्यालय,पाली. तर  वयोगट १९ मध्ये प्रथम ग. बा. वडेर हायस्कूल आणि व.ग.ओसवाल कनिष्ठ महाविद्यालय,पाली. व द्वितीय क्रमांक  संत नामदेव माध्यमिक विद्यालय ,नांदगाव यांनी मिळविला. या क्रिडा सामन्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या तीन संघांना आत्मोन्नती विद्यामंदिराचे संगीत शिक्षक संजय अवसरीकर यांच्या तर्फे प्रत्येकी २५० रुपयांचे रोख पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली