चिपळूण 

नगराध्यक्षा सौ. सुरेखा नितीन खेराडे यांनी शहरात स्वच्छता राहावी तसेच रोगराई पसरू नये म्हणून त्यावरील उपाययोजना करण्याचे प्रशासनाला सूचना दिल्या. 

नगरपरिषद प्रशासन शक्य असेल तितके शहर पूर्ववत स्वच्छ करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेत आहेत. 

शहरातील पुर परिस्थिती ओसरल्यावर रोगराई पसरू नये म्हणून  शहरात चिपळूण नगरपरिषदे तर्फे औषध फवारणी व ब्लिचिंग पावडर टाकण्यात येत आहे. 

आज  बाजारपेठ व इतर पूराच्या ठीकाणी आज औषध फवारणी व ब्लिचिंग पावडर टाकण्यात आली.

गेल्या आठवड्यात पुराच्या पाण्यात राहून नगरपरिषदेच्या प्रशासन व  कर्मचाऱ्यांनी अथक मेहनत घेतली. या सर्व कर्मचाऱ्यांसाठी एस.एम.एस.हॉस्पिटल , एक्सेल इंडस्ट्रीज , नगराध्यक्षा सौ.सुरेखा नितीन खेरा डे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशासन व कर्मचाऱ्यांसाठी मेडिकल कँप घेण्यात आले.

 

अवश्य वाचा

म्हसळा येथे माघी गणेशोत्सव