मागील आठवडा भरात झालेल्या प्रचंड पावसामुळे गोरेगाव शहर आणि परिसरातील शेतीला सलग आठ दिवस पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसल्यामुळे भातशेती सह शेतकरी संकटात सापडला आहे शेकडो हेक्टर शेतजमीनी वरती पाणी तुंबलेले राहिल्याने भाताचे पिक कुजून तसेच करपून गेले आहे त्यामुळे महसूल तसेच कृषी विभागाने या भागाची तातडीने पहाणी करून ओला दुष्काळाच्या धरतीवरती शेतकर्यांना मदत करावी अशी मागणी गोरेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जुबेर अब्बासी यांनी केली आहे.

दक्षिण रायगड या भागाला भाताचे कोठार म्हणून ओळख आहे बहुसंख्य जनता ही पावसाळ्यात शेती वरती अवलंबून असते मागील आठवड्यात गोरेगाव विभागात विक्रमी पाऊस झाल्याने शेकडो हेक्टर भात लागवडीची शेती सलग आठ दिवस पुराच्या पाण्या खाली होती. सुरूवातीला समाधान कारक पाऊस झाल्याने भात लावणी वेळेवरती आटोपली होती तर भात पिकांची रोपेही चांगली झाल्याने शेतकरी सुखावला होता. गोरेगावातील संत रोहिदास नगर, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर, हौदाची आळी, टेकडीची आळी,गवळ आळी, गोरोबा नगर येथील नागरिक आजही शेती वरतीच आपली उपजीविका करत आहेत.

  काळनदीला पूर आल्याने आठवडाभर पूराचे पाणी शेतामध्येच राहीले होते महापुराचा तडाखा बसल्यानंतरही सुदैवाने जीवित हानी झाली नाही मात्र शेतीच्या रूपाने मोठी वित्तहानी झाल्याचे निदर्शनास आले आहे. गोरेगाव चे सरपंच जुबेर अब्बासी उपसरपंच चंद्रकांत गोरेगावकर याच्यासह ग्रामविकास अधिकारी पोलेकर, विनोद बागडे, सचिन बागडे, सुरज पवार या ग्रामपंचायत सदस्यांसह लोकनेते विजयराज खुळे, मुख्तार वेळासकर, विकास गायकवाड यांनी पावसाने विश्रांती घेतल्या नंतर शेतीची पहाणी केली असता शेतकर्यांनी आपली व्यथा त्यांच्या समोर मांडली या नंतर महसूल तसेच कृषी विभागाने तातडीने पहाणी करून पंचनामे करावे व शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच जुबेर अब्बासी यांनी केली आहे. 

महाड भागातील सावित्री आणि गांधारी या दोन नद्यांच्या पुरा मुळे रासायनीक पाण्याचा मोठा फटका शेतीला बसला शेतामध्ये रसायन मिश्रित पाणी शेतात थांबून राहिल्याने रोप मोठ्या प्रमाणात करपलेली पहायला मिळत आहे त्यामुळे ही रोप पुन्हा जीवीत होणे केवळ अशक्य असल्याचे बोलले जात आहे  पावसाने यंदाचे पिक घालविल्या मुळे वर्षभर जगायचं कसं असा सवाल निर्माण झाला आहे.

अवश्य वाचा

म्हसळा येथे माघी गणेशोत्सव