आगरदांडा 

अतिवृष्टीमुळे खार अंबोली सह खतिब खार, जोसरांजण व तेलवडे या भागातील भात जमिनी पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे .. तेंव्हा शासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे आज तहसिलदारांकडे करण्यात आली . सदरहु निवेदनात वरील गावांची भात शेती सखल भागात असल्याने मुसळदार पाऊसामुळे संपुर्ण शेती पाण्याखाली गेली असुन समुद्राचे खारे पाणीही शिरले आहे . परिणामी भाताची नवीन  लावणी  करणे क्रमप्राप्त झाले होते . परंतु  लावणी करण्याची 20 ते 25 टक्के राबातील भाताची रोपे देखिल कजुन गेली आहेत . त्यामुळे भात लावणी कशी करावी हा मोठा प्रश्न आहे . आम्हाला नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे . तरी महसुल विभागाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून ताबडतोब नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे . 

निवेदन देते वेळी मनोज लक्ष्मण कमाने, गणेश म्हात्रे, विलास कमाने, नरेश वारगे, काशिनाथ भायदे व नयन कमाने आदी शेतकरी उपस्थित होते . 

अवश्य वाचा

म्हसळा येथे माघी गणेशोत्सव