प्रत्येक विवाहित जोडप्यास निसर्गतः स्वतःचे मूल होईलच असे नाही. बदलती जीवनशैली व इतर अनेक कारणांमुळे गेल्या तीन दशकांमध्ये वंध्यत्वाची टक्केवारी लक्षणीय वाढली आहे. स्त्री किंवा पुरुष किंवा दोघेही या समस्येला  कारणीभूत असू शकतात. परंतु आपल्या पुरुषप्रधान समाजात ही  बाब स्वीकारण्यास फार वेळ लागला.  स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही चाचण्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली होणे तितकेच महत्त्वाचे ठरते.

पश्चिम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरने नुकतेच ठाणे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे वंध्यत्व निवारण केंद्र कार्यान्वित केले आहे. या ठिकाणी महिला तसेच पुरुष वंध्यत्व निदान व उपचारांसाठी तज्ज्ञ उपलब्ध आहेत. रुग्णांना येथे जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाने परिणामकारक उपचार मिळत आहेत..

समाजात वंध्यत्वाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरचे सर्वेसर्वा डॉ नरहरी मळगांवकर हे संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहेत. ह्या उपक्रमाचाच एक भाग म्हणून येत्या ९ ते ११ ऑगस्ट रोजी ठाणे येथील  केंद्रामध्ये त्यांनी मोफत वंध्यत्व निवारण व चिकित्सा शिबिर आयोजित  केले आहे.

डॉ नरहरी यांच्या तर्फे महाराष्ट्रभरात आतापर्यंत अशा प्रकारची शेकडो मोफत शिबीरे घेण्यात आली असून, त्याचा लाभ हजारो रुग्णांना झाला आहे. या शिबीराच्या माध्यमातून मुल न झालेल्या दाम्पत्यांच्या दोषाविषयी मार्गदर्शन व टेस्टटय़ूब बेबी सारख्या प्रगत तंत्रज्ञानाविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येते.

या शिबिराबाबत अधिक माहिती देताना डॉ नरहरी यांनी सांगितले की, आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे वंध्यत्वाची समस्या वाढली आहे. लग्नास अधिक वर्षे झाल्यानंतर मूल जन्माला न येणे, अवेळी मासिक पाळी, गर्भधारणा होवूनही वारंवार गर्भपात होणे, गर्भाशयाला सूज असणे, पुरुषात शुक्रजंतूंशी निगडीत समस्या असणे, वजन जास्त असणे अशा अनेक कारणांनी वंध्यत्वाची समस्या निर्माण होते. त्यावर वेळीच अत्याधुनिक उपचार केल्यास विवाहित दाम्पत्याच्या जीवनातील बाळाचे स्वप्न साकार होवू शकते.

वंध्यत्व असलेल्या केवळ स्त्रियांचेच नव्हे; तर जोडप्यांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. ही त्या जोडप्याची व काळाची गरज आहे. समुपदेशन हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते हे विसरता कामा नये, असेही त्यांनी सांगितले .  

गेल्या तीन दशकांमध्ये वंध्यत्व उपचारांसाठी टेस्ट ट्यूब बेबी आणि सोबतच बऱ्याच उपचारपद्धती उदयास आल्या आहेत. नवनवीन तंत्रज्ञान व उपचार पद्धतींचा अवलंब करीत हजारो अपत्यहीन जोडप्यांना अपत्यप्राप्तीचे सुख मिळवून देणारे डॉ नरहरी मळगावकर यांची प्रसिद्धी अल्पावधीतच परदेशापर्यंत पोहचली. त्यांच्या कार्याची दखल घेत डॉ.मळगांवकर्स प्रोजेनेसिस टेस्ट ट्युब सेंटरला सिंगापूर येथे सर्वोत्तम टेस्ट ट्युब बेबी सेंटर तर  दुबई येथे वर्ल्ड ग्रेटेस्ट ब्रांड ह्या जागतिक दर्जाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या शिबिराचा अधिकाधिक रूग्णांनी लाभ घेण्यासाठी तसेच अधिक माहिती व नावनोंदणीसाठी मो. ७०३०९४४०४१/ ९४२३९७१६२० वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास