देशाचा स्वातंत्र्यदिन जवळ आला आहे. या दिवशी आपल्यापैकी प्रत्येक जण कागदी किंवा प्लास्टिकचे झेंडे, बॅच आपल्या कपड्यांना लावुन आपले देशाप्रती असलेले प्रेम व्यक्त करत असतो. सायंकाळी हेच झेंडे आणि बॅच आपण कुठेतरी अडगळीत काढून ठेवतो. स्वतंत्र भारतात जन्माला आल्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आपल्या पूर्वजांनी सहन केलेल्या हालअपेष्टांची आपल्याला तितकीशी जाण नाही. लहान मुलांच्या हाती कागदी ध्वज देताना त्यांनाही राष्ट्रध्वजाचे महत्व न सांगितल्यामुळे त्यांच्याकडून ते रस्त्यावर इतस्ततः टाकले जातात. आपण आपल्या मुलांना राष्ट्रध्वजाचे आणि त्यासाठी क्रांतिकारकांनी केलेल्या बलिदानाचे महत्व आतापासूनच समजावून सांगणे आवश्यक आहे. मुलांवर बालपणीच राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याचा संस्कार केला गेल्यास त्यांच्यामध्ये राष्ट्राविषयी प्रेम निर्माण होऊन त्यांच्याकडून अजाणतेपणाने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखला जाईल. 

 

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास