बेळगाव, अथणी  

संततधार पाऊस महाराष्ट्रातील धरणातून होणारा विसर्ग यामुळे बेळगाव जिल्ह्यातील नद्यांना पूर आला असून, पूरग्रस्तांच्या बचावासाठी रविवारी लष्कराला पाचारण करण्यात आले. तसेच जिल्ह्यात 9 ठिकाणी पूरग्रस्तांसाठी अन्‍नछत्र सुरू करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी ‘कृषी वल’शी बोलताना दिली. कृष्णाकाठ तसेच दूधगंगा आणि वेदगंगेच्या पूरग्रस्त भागात एमएलआयआरसीचे जवान शनिवारी दाखल झाले. त्यांनी पूरग्रस्तांना बोटीतून सुरक्षित स्थळी हलवण्याचे कार्य सुरू केले आहे. 

त्याबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले, महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा, दूधगंगा, वेदगांगा आदी नद्यांना पूर आला आहे. पाण्याची पातळी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आम्ही उपाययोजना करीत आहोत. नदीकाठच्या लोकांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना केल्या आहेत. लोकांना मदत करण्यासाठी लष्कर, आपत्कालीन पथक (एस. डी. आर. एफ), अग्नीशामक दलाची मदत घेण्यात येत आहे. तहसिल कार्यालय, पोलिस मुख्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आदी ठिकाणी चोवीस तास आपतकालीन कक्ष उघडण्यात आला आहे. 

ठिकठिकाणी लहान बोटी देण्यात आल्या असून, लष्काराचे, अग्नीशामक आणि पोलिस दला तैनात करण्यात आले आहे. पूरग्रस्त भागातील 9 ठिकाणी अन्नछत्र केंद्र सुरु करण्यात आले आहे. काही रस्ते पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्गावर बस वाहतूक सुरु करण्यात आली आहे. 

कृष्णा, दूधगंगा, वेददंगा नद्यांच्या पातळीत वाढू होवून नद्यांचे पाणी चिकोडी उपविभागातील अनेक गांवामध्ये व पिकांमध्ये शिरले असून 49 गांवांना फटका बसला  आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह, भारतीय सैन्य दल, एनडीआरएफ पथकांकडून अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासह छावणी केंद्राची निर्मितीसह बचाव कार्य हाती घेण्यात येत आहे.        

चिकोडी उपविभागातील चिकोडी,  निपाणी, कागवाड, अथणी, रायबाग तालुक्यातील नदी काठावरील लोकांचे स्थलांतर व बचाव कार्यासाठी 21 पथकांना पाचारण करण्यात आले आहे. यात 2 एनडीआरएफ पथके, 2 इंजिनियरिंग मिलिटरी एक्सपर्ट मिलिटरी पथक, अग्निशामक दलाचा समावेश आहे. यात 90  भारतीय सैनिक तर अग्निशामक दलाचे 75 जवान, 45 एनडीआरफ जवानांचा समावेश आहे.

आठ ठिकाणी छावणी केंद्र 

स्थलांतरित नागरिकांना राहण्यासाठी जिल्ह्यात  5 छावणी केंद्रे सुरु करण्यात आले असून तेथे जेवणाच्या सोयीसह जनावरांना चार्‍याची सोय करण्यात आली आहे. यात इंगळी, येडूरवाडी, कल्लोळ, जुगूळ, शिरगांव, रडेरट्टी, सप्तसागर, बणजवाड, नागनूर आदि ठिकाणी छावणी केंद्र सुरु करण्यात आले आहे. 

चकोडी उपविभागात 2,40000 क्युसेक पाण्याचा विसर्ग 

शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधार्‍यातून चिकोडी तालुक्यातील कृष्णा नदीला 2,00000 क्युसेक तर दूधगंगा नदीतून 4,0000 क्युसेक असे एकूण 2,40000 क्युसेक पाणी चिकोडी उपविभागात कृष्णा नदीला वाहून येत आहे. 

चार महिन्याच्या बाळाचे रक्षण : 

येडूरवाडी येथील डोणी मळ्यात  पाण्याने वेढा घातल्याने चार महिन्याचे बाळ  व बाळंतीण अडकून पडल्या होत्या. यावेळी जवानांकडून त्य

705 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले

चिकोडी उपविभागातील येडूर, इंगळी, येडूरवाडी डोणी मळ्यासह ठिकठिकाणी 19 शेतमळ्यातील 350 कुटुंबांना व 705 लोकांना  तर 250 जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. यावेळी अनेक लोक येत नसल्याने धोक्यामुळे जबरदस्तीने लोकांना हलविण्यात आल्याचे अनेक ठिकाणी घडले.

 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली