अथणी 

मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा हे सोमवारी (दि. 5) अथणी तालुक्यात पूरस्थिती पाहणी करणार असून ते तालुक्यातील सत्ती व नंदेश्‍वर येथे भेट देणार असल्याची माहिती आ. महांतेश कवटगीमठ यांनी दिली.

बागलकोट, रायचूर दौरा संपवून हेलिकॉप्टरने अथणी येथे आगमन होणार आहे. तेथून वाहनाद्वारे सत्ती व नंदेश्‍वर येथील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. यापूर्वी बेळगाव जिल्हा दौरा हवामान खराबामुळे रद्द करण्यात आला होता. पण आपण व लक्ष्मण सवदी यांनी त्यांची घरी भेट घेऊनविनंती केली. त्यानंतर त्यांनी सोमवारी अथणी तालुक्याचा दौरा करण्याचा निर्णय घेतल्याचे आ. कवटगीमठ यांनी दै. ‘कृषीवल’शी बोलताना सांगितले. 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली