बेळगाव 

मराठा लाईट इन्फंट्री सेंटरमध्ये 1 ऑगस्टपासून सैन्य दलात महिला पोलिस भरती सुरू आहे. तीन दिवसांत 650 युवती शारीरिक चाचणीत पात्र ठरल्या आहेत. रविवार व सोमवार अशी अजून दोन दिवस ही भरती चालणार आहे. देशभरात सैन्य दलात 100 महिला पोलिस जागांकरिता ही भरती सुरु आहे. 

पाच राज्यांतून भरतीसाठी युवती येत असून तिसर्‍या दिवशी केरळमधून मोठ्या संख्येने युवती भरतीसाठी आल्या होत्या. सकाळी सातपासून भरतीला प्रारंभ झाला. संततधार पावसामुळे भरती प्रक्रियेत अडथळे येत होते. सहा ठिकाणी कागदपत्रे तपासण्यापासून शारीरिक चाचण्या घेण्यापर्यंत भरती अधिकारी व्यस्त होते. सुरुवातील शैक्षणिक प्रमाणपत्रे तपासून भरती मैदानावर सोडण्यात येत होते. दीड किलोमीटर धावण्यासाठी सात मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर लांब उडी, उंच उडी आदी चाचण्या झाल्यानंतर वजन व उंची मोजण्यात येत आहे.

 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली