चिपळूण

कोकणातील घराघरात सहकार पोहोचवित कोकणाला सहकारातून समृध्दीकडे नेणाºया चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने पश्चिम महाराष्ट्रातही नेत्रदिपक कामगिरी केली आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीनही जिल्ह्यातील सर्व नऊ शाखांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सर्वांच्या सहकार्यानेच २५०० कोटी व्यवसायाचा टप्पा संस्था निर्धारीत वेळेत पूर्ण करेल, असा विश्वास संस्थेचे संस्थापक-चेअरमन, ज्येष्ठ सहकार नेते सुभाषराव चव्हाण यांनी व्यक्त केला.

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या ४५ व्या आणि कोल्हापूर शहरातील तिसऱ्या सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर शाखेचे उदघाटन सुभाष चव्हाण व ज्येष्ठ संचालिका सौ.स्मिता चव्हाण यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ सहकारतज्ञ श्री. देशपांडे, श्री. गुणे, संस्थेचे व्हाईस चेअरमन सूर्यकांत खेतले, राजेश वाजे, रवि भोसले, सोमा गुढेकर, राजेंद्र पटवर्धन व सर्व संचालक मंडळ, उद्योजक प्रशांत यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.स्वप्ना प्रशांत यादव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, कोल्हापूरवासीयांनी आमच्यावर मोठा विश्वास दाखविल्यानेच या शहरात आम्ही तिसरी शाखा सुरु केली. या रौप्यमहोत्सवी संस्थेच्या राज्यात आता ४५ शाखा झाल्या असून संस्थेचे १ लाख ११ हजार ८२० सभासद आहेत. संस्थेकडे ६३९ कोटी ३२ लाखांच्या ठेवी, ४७० कोटी २० लाखांच्यावर कर्ज वाटप. त्यापैकी प्लेज कर्ज १५७ कोटी ११ लाख, ४९ कोटी १७ लाख भाग भांडवल, ८८ कोटी ४७ लाख स्वनिधी, २५३ कोटी २२ लाख गुंतवणूक असून दरवर्षी सभासदांना १५ टक्के लाभांश अशी विश्वासार्ह आणि गौरवास्पद कामगिरी केली आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात नेत्रदिपक १२ कोटी ६ लाखांचा नफा मिळवून चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने राज्यातील अग्रगण्य यशस्वी पतसंस्था असे नाव स्वकर्तृत्वावर प्राप्त केले आहे.

कार्यक्रमाला कोल्हापूर व चिपळूणसह रत्नागिरी, खेड, देवरुख, कराड परिसरातील मान्यवरांचीही उपस्थिती होती. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.स्वप्ना प्रशांत यादव यांनी स्वागत केले. सूत्रसंचलन अशोक साबळे यांनी तर आभार संस्थेचे माजी व्हाईस चेअरमन अशोकराव कदम यांनी मानले.

अवश्य वाचा

म्हसळा येथे माघी गणेशोत्सव