सांगली

सतत संतधार पडणाऱ्या पावसाने सांगली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण केली आहे. त्या पाण्यावर पुलावरून उड्या मारणारे तरूणांचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. याची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात उडी मारू नये, नदी काठी जाऊन सेल्फी काढू नये, जे तरुण ऐकणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली.

सध्या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. सलग पडणाऱ्या पावसामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या आलेल्या पूराच्या पाण्यात धाडशी आणि पट्टीचे पोहणारे पूलावरून उड्या मारत आहेत. यामुळे काही ठिकाणी तरूण वाहूण गेल्याच्या घटना घडत आहेत. अशी घटना सांगली येथे घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आहे. 

कोयना, चांदोली दोन्ही धरणातून पाणी विसर्ग वाढवला आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळी वाढ होण्याची होणार आहे. त्यामुळे नदी काठच्या लोकांना सतर्गकतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी पुलावरून पूराच्या पाण्यात उडी मारणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी चौधरी यांनी माहिती दिली आहे. 

 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.