सातारा 

     सातारा - मेढा-महाबळेश्वर रस्त्यावर असलेल्या जावळी तालुक्यातील केळघर घाटात मोठी दरड कोसळली आहे. यामुळे महाबळेश्वर पर्यटक व स्थानिकांची वाहतूक ठप्प झाली असून वाहूतुक सुरू होण्यास एक दिवस लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मात्र, युद्धपातळीवर काम सुरू झाल्याने लवकरच रस्ता वाहूतुकीसाठी खुला होईल असे चिन्ह दिसत आहे.

         गेली आठवडा भर सतत कोसळणाऱ्या पावसाने सातारा जिल्ह्यातील जावळी, पाटण, महाबळेश्वर, सातारा तालुक्यातील कास पठार, ठोसेघर येथील घाटातील दरड कोसळत आहेत. त्यामुळे स्थानिकांना तसेच पर्यटनासाठी आलेल्या लोकांना अनेक संकटांशी सामना करावा लागत आहे.दरवर्षी पावसाळ्यापूर्वी घाट रस्त्यावरील दरड कोसळून दुर्घटना घडू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा प्रशासन शासकीय बैठका घेतल्या नंतर डागडुजी करण्यासाठी लाखों रुपये खर्च करतात. वरिष्ठ अधिकारी, ठेकेदार, लोकप्रतिनिधी अशी काही त्रिमूर्तीच्या देखरेखीखाली कामकाज करूनही दरड कोसळण्याची घटना थांबली नाही हे या गोष्टी मुळे सिद्ध झाले आहे.

    सातारहून महाबळेश्वर ला जाण्यासाठी केळघर घाट तर वाई येथून जाण्यासाठी पसरणी घाट असे दोन मार्ग आहेत. त्यापैकी केळघर घाटातील मोठी दरड कोसळली आहे. त्यामुळे संपूर्ण वाहूतुक ठप्प झाली असून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दगड, माती, मुरूम पडल्याने रस्ता मोकळा करण्यासाठी स्थानिकांच्या मदतीने हालचाली सुरू करण्यात आली आहे. या घाटातील रस्ते अरुंद असल्याने अडचणीला तोंड दयावे लागत आहे. या घाटातील निसर्ग सौंदर्य पाहून जेष्ठ अभिनेते देवानंद यांनी आठ वर्षांपूर्वी डोंगर पठारावरील मौंटी मुरा येथे बंगला बांधून ठेवला होता.तो सुद्धा धुक्यामुळे दिसत नाही.

    केळघर परिसरातील केळघर, केडंबे,वरोशी, म्हाते,आसणी,नांदगणी,धावली, वटांबे येथील स्थानिक लोक रोजगार व नोकरी, व्यवसाय निमित्त दररोज सकाळी उठून महाबळेश्वर ला ये जा करतात. त्यांना महाबळेश्वर ला जाता येत नाही. याच रस्त्यावरून पुढे प्रतापगड, महाड, रोह्याला जाण्याचा मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्त्या कराव्यात अशी मागणी म्हाते येथील शांताराम कांबळे, केडंब्याचे शिवसेना नेते एकनाथ ओंबळे,केळघरचे माजी सरपंच वसंतराव चव्हाण व ग्रामस्थांनी केली आहे.

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग