खेड

तालुक्यातील सवेणी येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लीश स्कुल मध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या ५० गरजू विदयार्थ्यांना रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील श्री साईनाथ दरबार सेवा संस्थेच्यावतीने हजारो रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य मंगळवारी दि ३० रोजी मठाधिपती श्री भाईनाथजी महाराज यांच्याहस्ते देण्यात आली. या कार्यक्रमाला सवेणी सरपंच मुख्तार कावलेकर यांच्यासह शिक्षक, शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील श्री साईनाथ दरबार सामाजिक  सेवा संस्थेच्यावतीने मठाधिपती श्री भाईनाथजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य सुरू आहे. रत्नगिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील हेदली गावातील शिक्षणप्रेमी ग्रामस्थ अहमद बांगी यांनी या संस्थेला हेदली व सवेणी पंचक्रोशीतील गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या शैक्षणिक साहित्यासाठी मदत मिळावी अशी विनंती केली होती. त्या विनंतीनुसार मंगळवार दि ३० रोजी मठाधिपती श्री भाईनाथजी महाराज यांनी सवेणी येथील न्यू इंग्लिश स्कुलला भेट दिली. यावेळी त्यांनी आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या पाच विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, कम्पास, पेन, पेन्सिल, खोडरबर यासह चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आयुर्वेदिक औषधी व पावसाळ्यात होणाऱ्या आजारापासून बचाव करता यावा म्हणून सहित्य देण्यात आले. यावेळी संस्थे हेदली व सवेणी गावातील अन्य ४५ गरजू विद्यार्थ्यांना देखील वह्या, कम्पास, पेन, पेन्सिल आदी अनेक शैक्षनिक वस्तूंचे संच वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला सवेणी सरपंच मुख्तार कावलेकर, शालेय समिती सदस्य हमजामिया चिपळूणकर, राजेंद्र गुजर, अहमद बांगी, रूपेश गांधी, अश्विनी वडके, जितेश कोळी, चंद्रकांत बनकर, निलेश म्हादे, प्रशाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

 

अवश्य वाचा

मुरूड - अलिबाग बस नादुरुस्त...