सर्व  मोगल सम्राटांत औरंगजेबाइतका बुद्धिमान, हुशार आणि  मूर्ख, इतका कर्तबगार, लबाड आणि कपटी, इतका प्रेमळ, दुष्ट आणि दीर्घद्वेषी, इतका सफाईने पापे करणारा आणि ईश्‍वराला भिणारा, इतका पुत्रद्वेष्टा, पिता आणि भाऊ यांचा छळ करणारा, दुसरा मोगल बादशहा निर्माण झाला नाही.
मुहिउद्दीन महंमद औरंगजेब याचा जन्म 24 ऑक्टोबर 1618 रोजी झाला. उपजत गुण, जाणूनबुजून कमी बोलणे, गंभीर चेहरा, एकलकोंडी स्वभाव, संशय येऊ नये म्हणून संसार, राज्य आपणास नको, अशा गप्पा मारणारा, हातात सतत कुराणाची प्रत, परिणामी खुद्द शहाजहानलाही त्याची भुरळ पडली होती. आपला रंग दाखवायला सुरुवात त्याने शहाजहान आजारी पडल्यावर केली. शहाजहान मेलीच अशी अफवा संपूर्ण हिंदुस्थानभर पसरविल्यावर ‘मारा आणि राज्य मिळावा’ या मोघली नीतीला अनुसरून शहाजहानचे चारही पुत्र एकमेकांच्या नरडीचा घोट घ्यायला उठले. तेव्हा औरंगजेबाने अजिबात उतावळेपणा न करता आपल्याला राज्य करण्यात बिलकूल रस नाही. तथापि, दारा हा इस्लामचा वैरी, तर शूजा पाखंडी असल्याने मुराद तूच गादीवर बसण्यास लायक आहेस, असा निरोप मिळताच मुराद हुरळला. इकडे शहाजहानचा दुसरा मुलगा खुजा याने दाराने बापाला विष देऊन ठार मारले, अशी अफवा पसरवली. पण, शहाजहानने मी जिवंत आहे, असा निरोप पाठवूनही विश्‍वास ठेवला नाही. दोघांमध्ये युद्ध झाले. त्यात दराचा विजय झाला. पण... पण इकडे मूर्ख मुरादने औरंगजेबावर विश्‍वास ठेवला होता. कारण, या ढोंगी औरंगजेबाने मुरादला कुर्नीसाद-साष्टांग नमस्कार करून हिंदुस्थानचा बादशहा म्हणून घोषित केले. काफर दाराला ठार मारल्यावर मी मक्केला निघून जाणार, या वक्तव्यावर भोळ्या मुरादने विश्‍वास ठेवला. हे दोघे भाऊ एकत्र झाल्याने दाराचे धाबे दणाणले. उभय फौजांची गाठ 15 एप्रिल, 1658 रोजी उज्जैनजवळील धरमपूर येथे पडली. त्यात दराचा दणदणीत पराभव झाला. तरीही दाराने पुन्हा फौज जमवली. चंबल नदीजवळ लढाई 25 मे, 1658 रोजी लढाई होऊन दाराचा सपशेल पराभव झाला. आणि, त्याने पळ काढला. इकडे औरंगजेबाने बापास कैद केले. आणि, मुरादचा राज्याभिषेक मुक्रर केला. आणि, त्याला शाही मेजवानीचे आमंत्रण दिले. मेजवानीला जाऊ नका, हा सल्ला गर्विष्ठ मुरादने धुडकाडला. औरंगजेबाने मुरादला भरपूर दारू पाजून बेशुद्ध केले व आपला लहान मुलगा अज्जम याच्या मदतीने त्याला निसाग केला. मुराद जेव्हा शुद्धीवर आला, तेव्हा आपण औरंगजेबाच्या कैदेत आहोत हे त्याला समजले. पुढे त्याच्यावर खुनाचा आरोप ठेवून ठार मारले. इकडे सूजा औरंगजेबाला घाबरून आरकानच्या (ब्रह्मदेश) राजाकडे आश्रित म्हणून आला. पण, आरकानच्या राजाने त्याला ठार मारले. आता राहिला दारा. तो औरंगजेबाच्या हातात आल्यावर 30 ऑगस्ट, 1659 रोजी त्याचे शिर कापून ठार मारले व ते शिर बादशहा शहाजहानला भेट म्हणून पाठवले. अशा रीतीने बाप आणि मोठे सख्ख्ये भाऊ जिवंत असतानाच भावांचे खून गादीवर आल्यानंतर केले. 21 जुलै, 1658 रोजी औरंगजेबाने स्वतःचे दिल्लीत जाऊन राज्यारोहण केले. तथापि, त्याचा बाप जिवंत असल्याने दिल्लीच्या काझीने त्याच्या नावाचा खुलासा वाचला नाही आणि बादशहा म्हणूनही त्याला मान्यता दिली नाही. मक्केच्या धर्माध्यक्षानेही शहाजहानशिवाय दुसर्‍या हिंदुस्थानच्या बादशहाला आपण ओळखत नाही, असा निरोप पाठविला. तरीही निर्लज्जपणे तो सिंहासनावर बसला. या महाराष्ट्राची माती मोघली पातशाहीत विलीन करता-करता तोच या मातीत वयाच्या 89व्या वर्षी, शुक्रवार, 20 फेब्रुवारी 1707 रोजी अहमदनगर येथे मरण पावला.
भावांना ठार मारून गादी बळकविण्याचा प्रकार त्याच्या बापाने म्हणजे शहाजहानने सुरु केला. बाप जिवंत असताना आपल्या सख्ख्या भावांना कपटाने ठार मारून गादी बळकावण्याची परंपरा औरंगजेबाने सुरु केली. म्हणून हाच दिवस त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस ठरून त्याची निवड केली.

 
दिनांक 21 जुलै 2019 
आजचे इतिहासातील दिनविशेष :
इतर दिनविशेष 21 जुलै 1) मुक्ती दिन -गुलाम 2) वांशिक सलोखा दिन- सिंगापूर 3) 1810- फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ हेन्री व्हिक्टर रेनॉव्ह यांचा जन्म. 4) 1986)- ‘रॉयटर’ या जगातील सर्वात मोठ्या वृत्तसंस्थेचे जनक पॉल ज्युलिअस रॉयटर यांचा जन्म. 5) 1910- रोजगार हमी योजनेचे जनक विठ्ठल पागे यांचा जन्म. 6) 1923- नोबेल विजेते अमेरिकन शास्त्रज्ञ रुडॉल्फ ए. मारकस यांचा जन्म. 7) 1926- ‘नवा मेन’ नावाचे पाक्षिक महादेव कांबळे यांनी सुरु केली. 8) 1934- चंदू बोर्डे, भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म. 9) 1935- मुंबई मराठी साहित्य संघाची स्थापना. 10) 1945- बॅरी रिचर्ड्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू यांचा जन्म. 11) 1970- इजिप्तमदे आस्वान धरणाचे बांधकाम पूर्ण. 12) 1975- रवींद्र पुष्पकुमार, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू यांचा जन्म. 13) 1994- मराठी बखरीचे अभ्यासक डॉ. रघुनाथ हेरवाडकर यांचे निधन. 14) 1997- साहित्यिक राजा राजवाडे यांचे अपघातात निधन. 15) 1998- अ‍ॅलन शेपर्ड, अमेरिकन अंतराळवीर यांचा जन्म. 16) 2002- पोस्टर आणि व्यक्तिचित्रणाकरिता नावाजलेले मराठी चित्रकार गोपाळराव बळवंतराव कांबळे यांचे निधन. 17) 2002- अमेरिकेतील जगभर दूरसंचार सेवा पुरवणारी कंपनी वर्ल्डकॉमने दिवाळे  काढले. 18) 2014- ईशांत शर्माने घेतलेल्या सात बळींच्या जोरावर भारताने लॉर्ड्सवरील दुसर्‍या कसोटीत इंग्लंडचा पराभव करून इतिहास घडविला. 19) 2015- बुरुंडी देशात राष्ट्रध्यक्षपदासाठी निवडणुकीत विरोधकांच्या बहिष्कारामुळे पुन्हा पिरी झुरुंझिझा यांचाच विजय. 20) 2016- उत्तर चीनमध्ये महापुरासह चक्रीवादळात 78 जण वाहून गेले. 21) 2016- फिलीपिन्सने ड्रग्समाफियांच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेत 500 जण ठार.
 
 

अवश्य वाचा

हृतिक रोशनने घेतले दर्शन.

शिवभक्तांची रांग.