उउदददचचचचचऊउउउङतखख ही काय भानगड  आहे? ही काही भानगड नसून पृथ्वीपासून चंद्र 2,38,857 कि.मी. दूर असल्याचे सांकेतिक चिन्ह आहे.
आजपासून 20 लाख वर्षांपूर्वी आदिमानव पृथ्वीवर होता. तेव्हापासून त्याला निसर्गातील असणार्‍या विविध घटकांचे फारच कुतूहल होते. त्यात त्याला सर्वात आकर्षण होते चंद्राचे. चंद्राबद्दल कथा, कविकल्पना करून मानवाने चंद्राचे वर्णन केले होते. पण, तो चंद्र म्हणजे प्रत्यक्षात आहे तरी काय? हे जाणण्याची स्पर्धा विज्ञान युगात जास्तच वाढली आणि या स्पर्धेचे स्पर्धक होते अर्थात अमेरिका आणि रशिया.
रशियाने ‘स्फुटनिक’ हा कृत्रिम उपग्रह सोडून याबाबतीत आघाडी घेतली होती. तसेच रशियाचे सर्व संशोधन लोखंडी पडद्याआड. त्यामुळे चंद्रावर स्वारी रशियाचीच असे बोलले जायचे. ‘ल्युनिक 1’ व ‘ल्युनिक 2’ ही दोन याने चंद्राच्या दिशेने झेपावलीसुद्धा. पण, अमेरिकाही काही कमी नव्हती. ‘पायोनियर 1’ व ‘पायोनियर 2’ व ‘पायोनियर 3’ ही अमेरिकेची तीन याने चंद्रमोहिमेवर निघाली. ‘ल्यूना 99’ हे रशियाचे यान तर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्यात रशियाला यश आले, तर ‘ल्यूना 13’ या रशियन यानाने चंद्राच्या जमिनीची माहिती 1966 च्या सुमारास मिळविली. अमेरिकेनेही याच सुमारास ‘सप्टेंबर 1’ हे शोधयान चंद्राच्या पृष्ठभागावर सुखरूपपणे उतरवले. ‘झोंड 5’ या यानात रशियाने कासव, धान्य, सूक्ष्म जंतू असे पदार्थ पाठविले तर ‘ल्यूना 15’ या रशियन यानाने तर कमालच केली. त्याने चंद्राच्या पृष्ठभागाच्या खडकांचे नमुनेच रशियात आणले. तर, इकडे अमेरिकेने ‘ऑर्बिटर’ हे यान चंद्रावर पाठवले. तर ‘सर्व्हेयर 5’ या अमेरिकेच्या यानाने चंद्राच्या पृष्ठभागाची प्रकाशचित्रे पृथ्वीवर पाठवली.
चंद्रावर स्वारी करण्याची जोरदार तयारी या दोन्ही देशांनी चालविली होती. पण, त्यात यश आले अमेरिकेला. अमेरिकेचा हा चंद्रविजयाचा वृत्तांत मोठा रोमांचकारी, थरारक व मानवाला थक्क करून सोडणारा आहे. चांद्रमोहिमेसाठी अमेरिकेचा ‘अपोलो’ प्रकल्प सिद्ध झाला. ‘अपोलो 11’ या यानातून चंद्रप्रवासाला निघणारे इतिहासाचे ते तीन साथीदार- निल आर्मस्ट्राँग, एडविन अल्ड्रींग व मायकेल कॉलीन्स सज्ज झाले होते. त्या तीन अवकाशवीरांची राहण्याची पद्धत अगदी शास्त्रीय होती. जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून त्यांना कोणालाही भेटण्याची परवानगी नव्हती. 16 जुलै 1969च्या पहाटे 4.15 वा. त्यांना जागे केले गेले. त्यानंतर वैद्यकीय तपासणी करून त्यांची शारीरिक अवस्था उत्तम असल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी दिला. यानंतर तिघांनी दूरध्वनीवरुन आपापल्या पत्नींशी संभाषण करुन निरोप घेतला.
आणि हा विज्ञानातला ऐतिहासिक क्षण पाहायला 20 जुलै 1969 रोजी फ्लोरिडामधील कोकिबीचवर दहा लाखांहून अधिक लोक जमले होते. हे भाग्यवान लोक समोरच्या दृश्याकडे टक लावून बघत होते. राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन हे व्हाइट हाऊसमध्ये रंगीत दूरदर्शनसमोर बसून त्याचे थेट प्रक्षेपण पाहात होते. बरोबर नऊ वाजता अवकाशयात्री यानात बसले. आता प्रत्यक्ष उड्डाणाला मात्र फक्त 32 मी. बाकी होती. 9.17 वाजता अवकाशयान स्वतःच्या शक्तीवर चालण्यास सिद्ध झाले. 9.28 वा. अग्निबाणाच्या तळाशी असणारी पाच अग्नियंत्रे प्रज्ज्वलित करण्यात आली. 9 वा. 31 मी. 52 से. होताच ‘सॅटर्न 5’ची पाच अग्नियंत्रे प्रज्ज्वलित झाली. पाच उदंड ज्वाला मंचाखातून बाहेर पडू लागल्या. आता फक्त 35 मी. उरली होती.
पोप, आर्मस्ट्राँगची पत्नी व दहा लाखांचा समुदाय जीव मुठीत धरून त्या क्षणाकडे डोळे लावून होता. ीळु, षर्ळींश, र्षेीी, ींहीशश, ीुें, ेपश, ूशीे, रश्रश्र शपसळपश र्ीीपपळपस 9.32 वा. नारंगी रंगाचा डोळे दिपवून टाकणारा अग्नीचा लोळ उठला. ‘अपोलो 11’ या अवकाश यानाने ‘सॅटर्न 5’ या भव्य रॉकेटाच्या माध्यमातून केथ केनेडी येथून चंद्राच्या दिशेने झेप घेतली. ताशी 38,400 कि.मी. वेगाने ‘अपोलो 11’ चंद्राकडे मार्गस्थ झाले. 109 तास 19 मी. 30 सेकंदाच्या प्रवासानंतर ‘अपोलो’ पृथ्वीवर सुखरूप पोहचले.  
(सौजन्य ः सहज शिक्षण यू ट्यूब वाहिनी)

 
 
दिनांक 20 जुलै 2019 

आजचे इतिहासातील दिनविशेष :
इतर दिनविशेष :
1) आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन. 2) 1641- डच जीवनशास्त्रज्ञ रंगनिअर डॉ. ग्राफ यांचा जन्म. 2) 1828- ‘मुंबापुरी वर्तमान’ हे वर्तमानपत्र सुरु. 3) 1903- फोर्ड मोटार कंपनीने आपली पहिले कर विकायला पाठविली. 4) 1908- आयजीराव महाराजांच्या पुढाकाराने ‘बँक ऑफ बडोदा’ची स्थापना. 5) 1919- एव्हरेस्ट सर्वप्रथम सर करणारे गिर्यारोहक एडमंड हिलरींचा जन्म. 6) 1921- न्यूयॉर्क व सॅन फ्रान्सिकोदरम्यान हवाई टपालसेवा सुरु. 7) 1924- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘बहिष्कृत हितकारिणी राजा’ या सामाजिक संस्थेची स्थापना केली. 8) 1926- मेथडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली. 9) 1937- नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ मार्कोनी यांचे निधन. 10) 1944- मुंबई शहरात कॉलराच्या साथीने 3400 लोक मृत्यमुखी पडल्याचे सरकारी अधिकार्‍यांनी मान्य केले. 11) 1945- भारतीय संशोधन येलूप्रदा सुब्बाराव यांनी कृत्रिमरित्या फॉलिक अ‍ॅसिड  तयार केले. 12) 1950- बॉलिवूडमधील एक चतुरस्त्र अभिनेते, नायक, खलनायक, विनोदी, अशी कोणत्याही प्रकारची भूमिका समर्थपणे साकारणारे अभिनेते नसिरुद्दीन शाह यांचा जन्म. 13) 1952- फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे पंधरावे ऑलम्पिक खेळ सुरू. 14) 1960- सिरिमाओ भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी. 15) 1969- अपोलो 11 यानातून अमेरिकन अंतराळवीर निल आर्मस्ट्राँग व एडविल ऑल्ड्रिन चंद्रावर उतरले. 16) 2004- शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांची गुजरमल पारितोषिकासाठी निवड. 17) 2014- योगाचे महत्त्व लक्षात घेता चीनमध्ये भारतातर्फे पहिले योग प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय. 18) 2015- 46व्या भारतीय कामगार परिषदेचे नवी दिल्लीत शानदार उद्घाटन. 19) 2016- अण्वस्त्र प्रसारबंदी विधेयकावर स्वाक्षरी करण्याचा भारताचा विचार नाही, असे सुष्मा स्वराज यांच्याकडून स्पष्ट  20) 2016- तृतीय पंथीयांच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षण विधेयकास केंद्र सरकारची मंजुरी.

अवश्य वाचा