डॉ. जयंत नारळीकरांचा जन्म 19 जुलै, 1938 रोजी कोल्हापूरला झाला. डॉ. जयंत यांच्या वडिलांना खुद्द पंडित मदन मोहन मालवीय यांनी इंग्लंडहून बोलावून बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नेमले. त्यांच्या मातोश्री या संस्कृत विषयातील एक थोर विदुषी होत्या. थोडक्यात, घरातील शैक्षणिक वातावरण अध्यात्म व आधुनिकतेची सांगड घालणारे होते. पदवी मिळाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी विशेषतः गणिताचा अभ्यास करण्यासाठी ते इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. तेव्हा एका अपघातात पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे कमरेपर्यंत प्लॅस्टर असतानाही रॅग्लरची परीक्षा ते उत्तीर्ण झाले.
आकाशाशी त्यांचे नाते जडले केंब्रिजमध्ये. तेथे त्यांना ‘फ्रेंड हॉएल’ यांचे ‘फंटियर्स ऑफ अकॅस्ट्रोनॉमी’ हे पुस्तक वाचायला मिळाले, तेव्हा माणसाच्या डोळ्यांना न दिसणार्‍या पण दुर्बिणीतून प्रकट होणार्‍या तारका विश्‍वाचा अभ्यास करता येतो, याचा त्यांना साक्षात्कार झाला. पुढे फ्रेंड हॉएल त्यांना मार्गदर्शक सहकारी म्हणून लाभले.
1963मध्ये गुरुत्वाकर्षण या विषयावरील शोध प्रबंधावर त्यांनी डॉक्टरेट मिळवली आणि 250 पौडांची डब्ल्यू.ए. मीक शिष्यवृत्ती मिळविणारे ते पहिलेच भारतीय ठरले. 1963 मध्ये किंग्ज कॉलेजने त्यांना फेलोशिप बहाल केली. तथापि, 1964 साली डॉ. जयंत नारळीकरांचे नाव जगातील सर्व देशांच्या रेडिओवरून ऐकू येऊ लागले, तेव्हा भारतीयांची मान ताठ झाली, ती त्यांनी लावलेल्या नव्या सिद्धांतामुळे! काय होता बर तो सिद्धांत?
आतापर्यंत विश्‍वोत्पत्तीचे दोन सिद्धांत होते. त्यात स्पंदन सिद्धांतानुसार एका बीजाच्या स्फोटातून तारकामंडळ निर्माण झाले, तर विस्फोट सिद्धांतानुसार एका प्राथमिक स्फोटातून तारे व आकाशगंगा निर्माण झाल्या. परंतु, हॉयल- नारळीकर सिद्धांतानुसार विश्‍वाची आजची स्तिथी कायम राहील. पूर्वी हीच स्थिती होती व यानंतरही तिच्यामध्ये फरक पडणार नाही. हाच तो खळबळजनक असा ‘स्थिरस्थिती सिद्धांत’ या सिद्धांतानंतर तर आंतरराष्ट्रीय पातळीवर जयंत नारळीकर हे नाव चमकू लागले. 1967मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठाचे अँडम्स पारितोषिक पटकावले. 1976मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठाची एससी.डी. ही सर्वोच्च पदवी संपादन केली. 1988मध्ये त्यांनी आयुका या संस्थेची स्थापना केली. 1994 ते 97 या काळात ते इंटरनॅशनल कॉस्मॉलॉजी कमिशनचे अध्यक्ष होते. त्यांच्या कार्याची दखल वेळेपूर्वीच घेऊन 1965 मध्येच त्यांना ‘पद्मभूषण’ हा पुरस्कार भारत सरकारने दिला.
शास्त्रज्ञांना साहित्यिक अंग नसते, असे म्हणतात. पण, याला अपवाद आहेत जयंत नारळीकर लेखक आणि वक्ता अशा दोन्ही भूमिका आज ते पार पाडत आहेत आणि विशेष म्हणजे या दोन्ही गोष्टी ते मायबोली मराठीतून सादर करतात. किंबहुना मराठी साहित्यात विज्ञानावर सोप्या रसाळ भाषेत लिहून मराठी विज्ञान साहित्य या नव्या प्रकाराचा पायंडाच त्यांनी पाडला. मराठीतून केलेले भाषण, लेखन रसिकांच्या हृदयाला जाऊन भिडते तसे इंग्रजीचे होत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. डॉ. नारळीकरांच्या मते जगभरातील शास्त्रज्ञांना कोड्यात टाकतात. सार्सचे विषाणू पृथ्वीबाहेरून पृथ्वीच्या वातावरणात आले, असे काहीसे वेगळे मत त्यांनी मांडले.
आज जग 21व्या शतकात असताना अंधश्रद्धा मात्र पहिल्या शतकापुढेही जाऊ देत नाही, याची त्यांना खंत आहे. ग्रह, जन्मपत्रिका, कुंडल्या जुळवणे हे थोतांड आहे, असे त्यांचे प्रांजळ मत आहे. त्यांच्या ‘आकाशाशी जडले नाते’ या पुस्तकात त्यांनी उदाहरणे देऊन या विषयाचा समाचार घेतला. इतके मोठे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शस्त्रज्ञ असूनही प्रसिद्धी माध्यमांपासून ते दूर राहतात.
 फलज्योतिषाचा विज्ञान विषयात समावेश कारण्याचा विचार केला जाताच वाहिन्यांच्या प्रतिनिधींना, पत्रकारांना न बोलवता एक छोटेसे पत्र लिहून केंद्र सरकारला निर्णय बदलायला लागला.

 
दिनांक 19 जुलै 2019

आजचे इतिहासातील दिनविशेष :
इतर दिनविशेष :
1. 1745 राणोजी शिंदे, पेशवाईतील घोडदळाचे प्रमुख
    सेनापती व जहागीरदार यांचे निधन.
2. 1877 आर्थर फिल्डर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
3. 1955 रॉजर बिन्नी, भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
4. 2014 उगांडात अतिरेकी हल्ल्यात 95 जण ठार.
5. 2016 माली येथील तम्पारा येथे झालेल्या
    अतिरेकी हल्ल्यात 21 जवान ठार.

अवश्य वाचा

हृतिक रोशनने घेतले दर्शन.

शिवभक्तांची रांग.