आधुनिक शिक्षण पद्धतीचा पाय हिंदुस्थानात इंग्रजांनी घातला. भारतीयांना पाश्‍चात पद्धतीचे शिक्षण मिळावे, असे काही मानवतावादी इंग्रजांना मनापासून वाटू लागले. तथापि, हिंदी लोकांना असे व कोणते व कसे शिक्षण द्यायचे, या घोळात इंग्रजांनी अनेक वर्षे घालवली. गव्हर्नर जनरल बॅटिंगच्या काळात मेकॉलेने हिंदी लोकांना इंग्रजी पद्धतीने शिक्षण द्यावे, असा ठराव 7 मार्च 1835 रोजी मंजूर करून घेतला. मात्र, इंग्रजी शिकलेले भारतीय केवळ रक्तानेच भारतीय असतील, पण विचारांनी मात्र पाश्‍चात्य असतील. थोडक्यात, शिकून शहाणी गाढवे बनविण्याचा हेतू होता. पुढे पुढे पाश्‍चात्य विचारसरणीच्या अनेक शाळा व महाविद्यालये हिंदुस्थानात स्थापन झाली. या सर्वांच्या कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी वुडच्या खलित्यात काही शिफारशी सांगण्यात आल्या होत्या. त्यात विद्यापीठांची कल्पना मंडळी होती. म्हणून सर जॉन कॅल्व्हिन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठासाठी एक समिती नेमली. या समितीच्या शिफारशी 12 डिसेंबर 1856 रोजी स्वीकारल्या गेल्या. त्यानुसार जानेवारी 1856 मध्ये कलकत्ता, सप्टेंबर 1856 मध्ये मद्रास आणि 18 जुलै 1856 रोजी मुंबई विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
मुंबई विध्यापीठ बाल्यावस्थेत असताना केवळ अभ्यासक्रम तयार करून परीक्षा घेणारी व पदवी देणारी संस्था असेच त्याचे स्वरूप होते. मुंबई राज्याचे गव्हर्नर एल्फिन्स्टन हे त्यावेळी विद्यापीठाचे कुलपती होते. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि सिंध इ. प्रांताचा समावेश त्यावेळी मुंबई विद्यापीठात होता. मुंबई सुप्रीम कोर्टाने न्यायाधीश यार्डले हे पहिले कुलगुरू होते. 1902 ते 1930 पर्यंत फर्दूनची दस्तूर यांची अर्धवेळ कुलगुरू म्हणून प्रथम नेमणूक झाली. पुढे अनेक मान्यवरांनी कुलगुरू म्हणून मुंबई विद्यापीठाचे कार्य पहिले. यामध्ये प्रामुख्याने डॉ. भांडारकर, न्या. चंदावरकर, न्या. छगला, न्या. भाग्यवती, प्राचार्य रॅम जोशी इत्यादींनी आपल्या विद्वतेने विद्यापीठ संपन्न केले. डॉ. मेरूनी बंगाली ह्या विद्यापीठाच्या इतिहासातील पहिल्या महिला कुलगुरू ठरल्या.
1859 साली विद्यापीठातर्फे मॅट्रिक्युलेशन परीक्षा घेण्यात आली. तेव्हा 132 विद्यार्थ्यांपैकी 22 मुलेच उत्तीर्ण झाली. यातील 15 मुले 1861 साली झालेल्या प्रथम वर्ष कला परीक्षेत बसली होती. त्यापैकी फक्त सात उत्तीर्ण झाली. तर पदवीच्या अंतिम परीक्षेत 1862 साली फक्त चार विद्यार्थी पदवीधर झाली. यात रानडे, भांडारकर, बाळ बागवे व वामन मोडक हे होते. 1913 सालापासून पदव्युत्तर शिक्षण देण्याचे कार्य विद्यापीठाने सुरु केले, तर 1948 पर्यंत माध्यमिक शालांत परीक्षा कायदा होईपर्यंत मॅट्रिकच्या परीक्षा घेण्याचे काम मुंबई विद्यापीठाकडे होते.
मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेनंतर 17 वर्षे झाली तरी विद्यापीठाची स्वतःची इमारत नव्हती. 1874 साली विद्यापीठची स्वतःची वास्तू उभी राहिली. तोवर तिची कचेरी टाऊन हॉलमध्ये होती. तेथेच सिनेटच्या बैठका आणि पदवीदान समारंभ होत असे. परंतु, विद्यापीठच्या वाढत्या कामामुळे अनेक नव्या इमारती विद्यापीठासाठी बांधण्यात आल्या. राजाबाई टॉवर ही मुंबई विद्यापीठाची वास्तू जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ बनले आहे. विद्यापीठचे शैक्षणिक वर्ष जून ते मार्च असे असून, अध्ययन व अध्यापनाचे माध्यम इंग्रजी असले तरी मराठी, गुजराती, हिंदी इ. भाषांतून उत्तरपत्रिका लिहिण्याची अनुमती विद्यार्थ्यांना आहे. पदवी परीक्षेला मराठी विषय ऐच्छिक म्हणून समाविष्ट करण्यासाठी न्या. रानड्यांनी प्रयत्न केला. पण, हा प्रयत्न 1920 साली फळाला आला.
मुंबई विद्यापीठातील ग्रंथालयात पाच लाखांच्या वर ग्रंथसंपदा असून, 15 कोटींची उलाढाल या विद्यापीठात आहे. न्या. रानडे, फिरोजशहा मेहता, सावरकर जांभेकर, भांडारकर असे कितीतरी देशभक्त, समाजसेवक, शास्त्रज्ञ मुंबई विद्यापीठाने भारताला व जगाला दिले आहेत. जागतिक विद्यापीठांमध्ये  मुंबई विद्यापीठाला मानाचे स्थान आहे.

दिनांक 18 जुलै 2019 

आजचे इतिहासातील दिनविशेष :
इतर दिनविशेष :
संविधान दिन : उरुग्वे
1) 1536 - इंग्लंडमध्ये पोपची सद्दी संपल्याचा फतवा काढण्यात आला.
2) 1635- ब्रिटिश शास्त्रज्ञ, स्थितीस्थापकत्वाच्या नियमांचे संशोधक रॉबर्ट हाकू यांचा जन्म.
3) 1852- इंग्लंडने निवडणुकीसाठी गुप्त मतदान अंगिकारले.
4) 1873- ऑस्कर दुसरा नॉर्वेच्या राजेपदी.
5) 1890- फ्रँक फोर्ड, ऑस्ट्रेलियाचा 15 वा पंतप्रधान यांचा जन्म.

6) 1918- म. गांधीजींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून द. आफ्रिकेच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी लढणार्‍या रणझुंझार सेनानी नेल्सन मंडेला यांचा जन्म.
7) 1925- अँडॉल्फ हिटलरने 39; माईन काम्फ 39; हे आत्मकथेसदृश्य पुस्तक प्रकाशित केले.
8) 1949- डेनिस लिली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू यांचा जन्म. वेगवान गोलंदाज म्हणून प्रसिद्ध.
9) 1965- सेव्हिएत संघाच्या झॉड 3 या अंतराळयानाचे प्रक्षेपण.

10) 1966- अमेरिकेच्या जेमिनी 10 या अंतराळयानाचे  प्रक्षेपण.

11) 1977- व्हिएतनामचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.

12) 1982- बॉलिवूडची देशी गर्ल, अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा जन्म.

13) 1990- मुन बॉसिओन, दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षा यांचे निधन.

14)2012- हिंदी चित्रपटसृष्टीचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांचे निधन.

15) 2014- गुजरातमधील सूरत शहरात 1993 साली बॉम्बस्फोट घडवून आणणार्‍या आणि याप्रकरणी दोषी ठरलेल्या सर्व 11 आरोपींची सुटका.

16)2015 - सौदी अरेबियात इसिसची संबंध असल्याच्या आरोपावरुन 431 जणांना अटक.

17) 2016- तब्बल 32 वर्षांनंतर आफ्रिकी महासंघात सामील होण्याचा मोरोक्को देशाचा निर्णय.

18) 2016- भा.ज.प खासदार नवज्योतसिंग सिधू यांचा राजीनामा

अवश्य वाचा

हृतिक रोशनने घेतले दर्शन.

शिवभक्तांची रांग.