वेणगाव 

      युनिफाईट कराटे असोसिएशन कोल्हापूर यांच्या सहकार्याने शनिवार ,रविवार दि, २७ व २८ /७ /२०१९ रोजी  ८ वी युनिफाईट राज्यस्तर स्पर्धा आणि युनिफाईट असोसिएशन कोल्हापूर  २०१९  ही स्पर्धा कोल्हापूर येथे संपन्न झाली. 

         या स्पर्ध्ये मध्ये कर्जत मधील ४ खेळाडूंनी विविध वजनी वयोगटातील विभागामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून  (१ ) सुवर्ण , (२ ) रौप्य पदक  आणि (१ ) कांस्य पदक मिळवले .  आता या सर्व खेळाडूची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे . येणाऱ्या दिनांक ३० आणि ३१ ऑगस्ट २०१९ ला हे सर्व खेळाडू आता त्यांच्या विवेक गायकवाड यांच्या नेतृत्व आणि  मार्गदर्शनाखाली  राष्ट्रीय स्तरावर पंजाब ( लुधियाना )  येथे आता आपल्या महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी म्हणून खेळणार आहेत. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षण देणारे कर्जत चे मुख्य  प्रशिक्षक विवेक गायकवाड यांचे खूप मोलाचे सहकार्य ,  लाभले  या  स्पर्धेत 

१ ) कु. जगदीश बाळकृष्ण पेरणेकर  सुवर्ण पदक ( Gold Medal ) ,

२ ) प्रतीक निलेश बनसोडे  रौप्य पदक ( Silver Medal )

३ ) आदित्य पवन कुमार सूर्यवंशी  रौप्य पदक ( Silver Medal )* 

४ ) श्रेयश संतोष लवांडे  कांस्य पदक ( Bronze Medal )

      यां सर्व खेळाडूंचे  कर्जत मध्ये  अभिनंदन  होत असून   शुभेच्छाच वर्षाव होत आहे

अवश्य वाचा

मुरूड - अलिबाग बस नादुरुस्त...